
इंदिरा संत (जानेवारी ४, १९१४, इंडी - जुलै १३, २०००, पुणे) या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले.
राहुल देव बर्मन उर्फ आर. डी. बर्मन (२७ जून इ.स. १९३९ - ४ जानेवारी इ.स. १९९४) हे एक भारतीय संगीत दिग्दर्शक होते. त्यांना बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ संगीतकारांपैकी एक मानले जाते. आपल्या १९६१ ते १९९४ दरम्यानच्या कारकिर्दीमध्ये बर्मनने ३३१ चित्रपटांना संगीत दिले व स्वत: काही गाणी देखील म्हटली. किशोर कुमार व आशा भोसले हे त्याचे विशेष आवडीचे पार्श्वगायक होते.
म्यानमारचा मुक्तीदिन
आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन
१४९३ - क्रिस्टोफर कोलंबस आपल्या पहिल्या सफरीच्या अंती नव्या जगातून परत निघाला.
१६४२ - इंग्लिश गृहयुद्ध - चार्ल्स पहिल्याने ब्रिटीश संसदेवर हल्ला केला.
१७१७ - नेदरलँड्स, इंग्लंड व फ्रांसने तिहेरी तह केला.
१७६२ - इंग्लंडने स्पेन व नेपल्स विरूद्ध युद्ध पुकारले.
१८४७ - सॅम्युअल कॉल्टने अमेरिकन सरकारला पहिले रिव्होल्व्हर पिस्तुल विकले.
१८८१ - लोकमान्य टिळकांनी केसरी वृत्तपत्र सुरू केले.
१८९६ - युटाह अमेरिकेचे ४५वे राज्य झाले.
१९४८ - म्यानमार(तत्कालीन बर्मा)ला युनायटेड किंग्डमकडून स्वातंत्र्य.
१९५१ - कोरियन युद्ध - चीन व उत्तर कोरियाच्या सैन्याने सेउल काबीज केले.
१९५८ - स्पुतनिक १, पहिला मानवनिर्मित उपग्रह पृथ्वीवर पडला.
१९५९ - रशियाचे अंतराळयान, लुना १, चंद्राच्या जवळ पोचले.
१९६२ - न्यूयॉर्कमध्ये चालकरहित रेल्वे सुरू झाली.
१९७४ - अमेरिकेची सेनेटच्या वॉटरगेट समितीने मागितलेली कागदपत्रे देण्यास अध्यक्ष रिचर्ड निक्सनने नकार दिला.
१९८९ - अमेरिकन नौदलाच्या २ एफ.१४टॉमकॅट विमानांनी लिब्याची २ मिग २३ फ्लॉगर विमाने पाडली.
१९९० - पाकिस्तानच्या सिंध प्रांतात प्रवासी रेल्वे थाबलेल्या मालगाडीवर आदळली. ३०० ठार.
१९९९ - पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये एका शिया मशीदीवर नमाज दरम्यान गोळीबार. १६ ठार, २५ जखमी.
२००४ - मिखाइल साकाश्विली जॉर्जियाच्या अध्यक्षपदी.
२००४ - नासाची मानवरहित गाडी, स्पिरिट, मंगळावर उतरली.
२००७ - नान्सी पेलोसी अमेरिकेच्या हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्जची सभापती असणारी प्रथम स्त्री ठरली.
१०७७ - झ्हेझॉँग, साँग वंशाचा चीनी सम्राट.
१६४३ - सर आयझेक न्यूटन, इंग्लिश शास्त्रज्ञ व तत्त्वज्ञानी.
१८०९ - लुई ब्रेल दृष्टिहीनांसाठी 'ब्रेल लिपी' तयार करणारा.
१८१३ - आयझॅक पिट्समन लघुलिपी(शॉर्टहँड) तयार करणारा.
१८४८ - कात्सुरा तारो, जपानी पंतप्रधान.
१९०० - जेम्स बाँड, अमेरिकन पक्षीशास्त्रज्ञ.
१९०९ - प्रभाकर पाध्ये, मराठी नवसाहित्यिक.
१९१४ - इंदिरा संत, मराठी कवियत्री.
१९२४ - विद्याधर गोखलेनाटककार,खासदार,लेखक संपादक.
१९३७ - सुरेंद्रनाथ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९४० - श्रीकांत सिनकर, मराठी कादंबरीकार.
१९५३ - जॉर्ज टेनेट, अमेरिकन गुप्तहेर यंत्रणा, सी.आय.एचा निदेशक.
१२४८ - सांचो दुसरा, पोर्तुगालचा राजा.
१५६४ - होसोकावा उजित्सुना, जपानी सेनापती.
१६९५ - फ्रांस्वा हेन्रि दि मोंतमोरेंसी-बुतेव्हिल, फ्रांसचा सेनापती.
१८३१ - जेम्स मन्रो, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.
१८५१ - दुसरे बाजीराव पेशवे कानपूरजवळ ब्रह्मावर्त येथे निधन.
१८७७ - कोर्नेलियस व्हान्डरबिल्ट, अमेरिकन उद्योगपती.
१९०७ - गोवर्धनराम त्रिपाठी 'सरस्वतीचंद्र' या गुजराती कादंबरीचे लेखक.
१९०८ - राजारामशअस्त्री भागवत विचारवंत व संस्कृत पंडित.
१९६५ - टी.एस.इलियट, अमेरिकन साहित्यिक.
१९९४ - राहुल देव बर्मन
२००६ - मक्तूम बिन रशीद अल् मक्तूम, दुबईचा शेख वसंयुक्त अरब अमिरातीचा पंतप्रधान.
Post a Comment