१६ फेब्रुवारी

फेब्रुवारी १६ - दिनविशेष

श्रीमंत थोरले माधवराव पेशवे, (फेब्रुवारी १६, १७४५ - नोव्हेंबर १८, १७७२), हे मराठी राज्याचे चौथे पेशवे (पंतप्रधान) होते. बाळाजी बाजीरावास विश्वासराव, माधवराव,व नारायणराव असे तीन पुत्र होते. विश्वासराव हा पानिपतच्या तिसऱ्या युद्धात पडल्यामुळें माधवरावास पेशवाईची वस्त्रे मिळाली. त्या वेळी माधवरावाचें वय अवघे सोळा वर्षांचे असल्यामुळे त्याचा चुलता रघुनाथराव हा कारभार पाहू लागला. वास्तविकपणे माधवराव हा जरी अल्पवयीन होता, तरी तो बुद्धिमान असल्यामुळे त्याने पेशवाईतील घडामोडी मोठया सूक्ष्म रितीने अवलोकन केल्या होत्या. म्हणून राज्यकारभार स्वतः चालविण्याची धमक व बुद्धी ही त्याच्या अंगी होती.

जागतिक दिवस :

स्वातंत्र्य दिन - लिथुएनिया.

ठळक घटना/घडामोडी :

१७४२ - स्पेन्सर कॉम्प्टन इंग्लंडच्या पंतप्रधानपदी.

१८३८ - दक्षिण आफ्रिकेत झुलु सैन्याने ब्लौक्रान्स नदीच्या काठी शेकडो फूरट्रेकरना मारले.

१८६२ - अमेरिकन यादवी युद्ध - जनरल युलिसिस एस. ग्रँटने फोर्ट डोनेलसनचा किल्ला काबीज केला.

१९१८ - लिथुएनियाने रशिया व जर्मनीपासून स्वातंत्र्य जाहीर केले.

१९२३ - प्राचीन इजिप्तचा राजा तुतेनखामेनची कबर उघडण्यात आली.

१९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या सैन्याने बटान परत मिळवले.

१९५९ - फिदेल कास्त्रो क्युबाच्या राष्ट्राध्यक्षपदी.

१९८३ - ऑस्ट्रेलियातील वणव्यात ७१ मृत्युमुखी.

१९९८ - चायना एरलाइन्स फ्लाइट ६७६ हे एरबस ए३०० जातीचे विमान तैवानच्या च्यांग-काइ-शेक विमानतळाजवळ कोसळले. जमिनीवरील ६ व्यक्तिंसह २०२ ठार.

जन्म/वाढदिवस :

१०३२ - यिंगझॉँग, चीनी सम्राट.

१२२२ - निचिरेन, जपानमधील निचिरेन बौद्ध पंथाचा स्थापक.

१७४५ - थोरल्या माधवराव पेशव्यांचा जन्म

१८२२ - बोटांच्या ठशांचे वेगळेपण सिध्द करणाऱ्या ’सर फ़्रान्सिस गाल्टन’ यांचा जन्म

१८७६ - रँगलर परांजपे यांचा जन्म

१९४१ - किम जोँग-इल, उत्तर कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.

१९५४ - मायकेल होल्डिंग, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

१२७९ - तिसरा आफोन्सो, पोर्तुगालचा राजा.

१३९१ - जॉन पाचवा पॅलिओलोगस, बायझेन्टाईन सम्राट.

१८९९ - फेलिक्स फॉउ, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.

१९४४ - दादासाहेब फ़ाळके स्मृतिदिन

१९५५ - सुप्रसिध्द शास्त्रज्ञ मेघनाथ साहा यांचे निधन

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top