९ जानेवारी

जानेवारी ९ - दिनविशेष

प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी भारतामध्ये ९ जानेवारी रोजी साजरा केला जातो. ९ जानेवारी १९१५ रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेहून मुंबईमध्ये परतले होते.[१] ह्याप्रित्यर्थ २००३ सालापासून दरवर्षी अनिवासी भारतीय नागरिकांच्या भारताच्या प्रगतीमधील योगदानासाठी प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जात आहे. ह्याचे आयोजन भारत सरकारचे अनिवासी भारतीय कार्य मंत्रालय (Ministry of Overseas Indian Affairs) व उत्तर पूर्वी क्षेत्र विकास मंत्रालय (Ministry for Development of North Eastern Region), फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री ह्यांच्या मार्फत केले जाते.

जागतिक दिवस :

शहीद दिन - पनामा

प्रवासी भारतीय दिवस - भारत

ठळक घटना/घडामोडी :

१२८८ - ज्ञानेश्वर महाराजांनी पैठण येथे रेड्याकडून वेद म्हणवून घेतले.

१३४९ - प्लेगचे कारण ठरवून बासेल, स्वित्झर्लंडमधील ज्यूंना जाळण्यात आले.

१४३१ - जोन ऑफ आर्कवर खटला सुरू.

१७६० - बराई घाटच्या लढाईत अफघाणांकडून मराठ्यांचा पराभव.

१७८८ - कनेक्टिकट अमेरिकेचे पाचवे राज्य झाले.

१८५८ - प्रजासत्ताक टेक्सासच्या पहिल्या अध्यक्ष ॲन्सन जोन्स]ने आत्महत्या केली.

१८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - मिसिसिपी अमेरिकेपासून विभक्त होणारे दुसरे राज्य झाले.

१८६३ - अमेरिकन यादवी युद्ध - फोर्ट हिंडमनची लढाई.

१८७८ - उंबेर्तो पहिला इटलीच्या राजेपदी.

१८८० - वासुदेव बळवंत फडके- क्रांतिकारक यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा.

१८८२ - ऑस्कार वाइल्डने न्यूयॉर्कमध्ये इंग्लिश कलेचे पुनरुत्थान या विषयावर पहिले व्याख्यान दिले.

१९१२ - अमेरिकेने होन्डुरासवर हल्ला केला.

१९१६ - कानाक्केलची लढाई - ब्रिटीश सैनिकांची माघार.

१९१७ - पहिले महायुद्ध - रफाची लढाई.

१९४५ - अमेरिकेने फिलिपाईन्समधील लुझोनवर हल्ला केला.

१९५१ - न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांचे मुख्य कार्यालय सुरू झाले.

१९६० - इजिप्तमध्ये आस्वान धरणाचे बांधकाम सुरू झाले.

१९६४ - अमेरिकेच्या ताब्यातील पनामा कालव्यावर पनामाचा ध्वज फडकावण्यावरून दंगल.

१९९१ - लिथुएनियाला विभक्त होण्यापासून थांबविण्यासाठी सोवियेत संघाने व्हिल्नियसवर हल्ला केला.

१९९७ - डेट्रॉईटच्या विमानतळावर एम्ब्राएर १२० जातीचे विमान कोसळले. २९ ठार.

२००१ - चीनने शेन्झू २ या मानवरहित अंतराळयानाचे प्रक्षेपण केले.

२०११ - इराण एअर फ्लाइट २७७ हे बोईंग ७२७ प्रकारचे विमान इराणच्या पश्चिम अझरबैजान प्रांतातील उर्मिया शहरात कोसळले. ७०पेक्षा अधिक ठार.

२०१५ - व्हिस्टारा ह्या भारतीय प्रवासी विमानकंपनीच्या कार्यास सुरूवात.

जन्म/वाढदिवस :

१५५४ - पोप ग्रेगोरी पंधरावा.

१६२४ - मैशो, जपानी सम्राज्ञी.

१८५९ - जेम्स क्रॅन्स्टन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१८८७ - डॅन टेलर, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

१९१३ - रिचर्ड निक्सन, अमेरिकेचे ३७वे अध्यक्ष

१९२२ - हरगोविंद खुराना, नोबेल-पुरस्कृत भारतीयवंशी जैव-रसायनशास्त्रज्ञ.

१९२७ - रा.भा. पाटणकर- सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक, समीक्षक.

१९३४ - महेंद्र कपूर, भारतीय पार्श्वगायक.

१९५६ - डेव्हिड स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९६८ - जिमी ॲडम्स, वेस्ट-इंडियन क्रिकेट खेळाडू.

१९७२ - गॅरी स्टेड, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.

१९७४ - क्रेग विशार्ट, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

१२८३ - वेन तियान्शिंग, चीनी पंतप्रधान(मृत्युदंड).

१८४८ - कॅरॉलीन हर्शेल - खगोलशास्त्रज्ञ.

१८७३ - नेपोलियन तिसरा, फ्रेंच सम्राट.

१८७८ - व्हिक्टर इमॅन्युएल दुसरा, इटलीचा राजा.

१९६१ - एमिली ग्रीन बाल्च, अमेरिकन लेखिका.

१९७५ - प्योत्र सर्जेयेविच नोव्हिकोव्ह, रशियन गणितज्ञ.

१९९७ - एडवर्ड ओसोबा-मोराव्स्की, पोलंडचा पंतप्रधान.

१९९८ - केनिची फुकुई, नोबेल पारितोषिक विजेता जपानी रसायनशास्त्रज्ञ.

२००४ - शंकरबापू आपेगावकर- राष्ट्रीय ख्यातीचे पखवाजवादक.भारत

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top