
चंद्रकांत रघुनाथ गोखले (जानेवारी ७, इ.स. १९२१, मिरज, सांगली संस्थान - जून २०, इ.स. २००८, पुणे, महाराष्ट्र) हे मराठी नाट्यअभिनेते व चित्रपट अभिनेते आणि गायक होते. मराठी अभिनेत्री कमळाबाई गोखले या यांच्या आई होत्या. यांचे पुत्र विक्रम गोखले हेदेखील अभिनेते आहेत.
शोभा डे ( जन्म ७ जानेवारी १९४८ ) या प्रसिद्ध भारतीय लेखक आणि स्तंभलेखक आहेत. पेज थ्री कल्चर अशी ओळख असलेल्या संपन्न भारतीयांच्या सांस्कृतिक- सामाजिक जीवनाशीच त्या आयुष्यभर प्रामुख्याने निगडित राहिल्याने त्यांच्या लेखनातूनही याच जीवनाचे चित्रण आढळते.
जॉनी लिव्हर (ऑगस्ट १४, इ.स. १९५६:अमकम, प्रकाशम जिल्हा, आंध्र प्रदेश - ) हा बॉलिवूडमधील विनोदी अभिनेता आहे. याचे मूळ नाव जनार्दन राव असे आहे. जॉनी लिव्हर यांचे कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशचे. त्यांंचेे वडील प्रकाशराव जानुमाला आणि आई करुणाम्मा हे मुंबईतील माटुंग्याच्या लेबर कॅम्प-धारावीमध्ये एका चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरात राहायचे.
-
१६१० - गॅलिलिओकडून गुरु ग्रहाचा शोध लागला.
१९३२ - भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना कॉंग्रेस इक्टेटर म्हणून कैद करण्यात आली.
१९९२ - विश्वनाथ आनंदला ग्रॅन्डमास्टर हा दर्जा प्राप्त झाला.
१५०२ - पोप ग्रेगोरी तेरावा
१७८९ - आइल्हार्ड मिट्शेर्लिख - रसायनशास्त्रज्ञ. बेंझिन व मिथिल या रसायनांचा शोधक .
१८०० - मिलार्ड फिलमोर, अमेरिकेचा तेरावा राष्ट्राध्यक्ष.
१८२७ - सर सँडफोर्ड फ्लेमिंग, केनेडियन अभियंता.
१८५८ - एलीझर बेन-येहुदा, हिब्रू भाषातज्ञ.
१९१० - फैझ अहमद फैझ, उर्दू कवी.
१९१२ - चार्ल्स अॅडाम्स - न्यू यॉर्कचा व्यंगचित्रकार.
१९२० - सरोजिनी बाबर - लोकसाहित्याच्या अभ्यासक.
१९२१ - चंद्रकांत गोखले, मराठी रंगभूमी नट व चित्रपट अभिनेता.
१९२५ - जोराल्ड डरेल - प्राणी व निसर्ग लेखक.
१९४५ - रैला ओडिंगा, केन्याचा पंतप्रधान.
१९४८ - शोभा डे, भारतीय लेखिका.
१९५० - जॉनी लिव्हर, भारतीय अभिनेता.
१९६४ - निकोलस केज, अमेरिकन अभिनेता.
१९७९ - बिपाशा बासू, भारतीय चित्रपट अभिनेत्री.
१९८९ - मिचियोमिया हिरोहितो - जपानचे सम्राट.
Post a Comment