
सावित्रीबाई फुले (जन्म : नायगाव-सातारा जिल्हा, जानेवारी ३, इ.स. १८३१ - मृत्यू : पुणे, मार्च १०, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.
महिला मुक्ती दिन.
बालिका दिन.
ऑक्युपेशन थेरपी दिन.
१४३१ - जोन ऑफ आर्क बिशप पिएर कॉशोंच्या हाती लागली.
१४९६ - लिओनार्डो दा विन्चीने उड्डाणयंत्राचा एक असफल प्रयोग केला.
१५२१ - पोप लिओ दहाव्याने पोपचा फतवा काढून मार्टिन ल्यूथरला वाळीत टाकले.
१७७७ - प्रिंसटनची लढाई - जॉर्ज वॉशिंग्टनने चार्ल्स कॉर्नवॉलिसचा पराभव केला.
१८१५ - ऑस्ट्रिया, ब्रिटन व फ्रांसने एक गुप्त तह मंजूर करून रशिया व प्रशिया विरूद्ध संयुक्त फळी उभारली.
१८२३ - स्टीवन ऑस्टिनने मेक्सिको सरकारकडून टेक्सासमध्ये जमीन मिळविली.
१८३३ - ब्रिटनने फॉकलंड द्वीपसमूह बळकाविले.
१८३४ - स्टीवन ऑस्टिनला मेक्सिको सरकारने मेक्सिको सिटीत तुरूंगात टाकले.
१८५५ - हवाईमध्ये चीनी नागरिकांचे प्रथम आगमन.
१८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - डेलावेरने संयुक्त संस्थानातून बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला.
१८६८ - जपानमध्ये शोगन सत्ता संपली. मैजी वंश पुन्हा राज्यकर्ता.
१९२१ - तुर्कस्तानने आर्मेनियाशी संधी केली.
१९२५ - बेनितो मुसोलिनीने इटलीत हुकुमशाही जाहीर केली.
१९५० - पुणेयेथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उदघाटन.
१९५२ - स्वतंत्र भारतातपहिल्या राष्ट्रीय निवडणुका.
१९५७ - विद्युत घाटांवर चालणारे पहिले घड्याळ बाजारात.
१९५९ - अलास्का अमेरिकेचे ४९वे राज्य झाले.
१९६१ - अमेरिकेने क्युबाशी संबंध तोडले.
१९६२ - पोप जॉन तेविसाव्याने फिदेल कास्त्रोला वाळीत टाकले.
१९९० - पनामाच्या मनुएल नोरिगाने अमेरिकी सैन्यासमोर आत्मसमर्पण केले.
१९९४ - रशियात ईर्खुट्स्क येथून निघालेले एरोफ्लोतचे टी.यू.१५४ प्रकारचे विमान कोसळले. जमिनीवरील एकासह १२५ ठार.
२००४ - ईजिप्तच्या फ्लॅश एरलाइन्स फ्लाइट ६०४ हे बोईंग ७३७ प्रकारचे विमान लाल समुद्रात कोसळले. १४८ ठार.
१८३१ - सावित्रीबाई फुले, आधुनिक भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका, समाजसुधारक, महात्मा जोतीराव फुले यांची पत्नी.
१८८३ - क्लेमेंट ऍटली, ब्रिटीश पंतप्रधान.
१८८६ - जॅक झुल्च, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१८८८ - कागदी स्ट्रॉचा वापर सुरू.
१८९२ - जे.आर.आर.टोकियेन, ब्रिटीश लेखक व भाषाशास्त्री, लॉर्ड ऑफ द रिंग्ज या पुस्तकत्रयीचा लेखक.
१९१७ - कर्तारसिंग दुग्गल, पंजाबी साहित्यिक.
१९२२ - चोइथराम बाबाणी, सिंधी साहित्यिक.
१९३१ - यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहाससंशोधक.
१५४३ - हुआन रोद्रिगेझ काब्रियो, पोर्तुगालचा शोधक.
१९६७ - जॅक रूबी, ली हार्वे ऑस्वाल्डचा मारेकरी.
१९७५ - ललित नारायण मिश्रा, भारतीय रेल्वेमंत्री, राजकारणी.
१९८२ - अब्राहम डेव्हिड, भारतीय अभिनेता.
१९९४ - अमरेंद्र गाडगीळ, मराठी बाल-कुमार लेखक.
१९९८ - केशव विष्णू बेलसरे, मराठी तत्त्वज्ञानी.
२००१ - सुशीला नायर, भारतीय आरोग्यमंत्री, भारतीय राजकारणी.
२००२ - फ्रेडी हाइनिकेन, डच बियर उद्योगपती.
२००२ - सतीश धवन, भारतीय अंतराळशास्त्रज्ञ.
२००५ - जे.एन.दिक्षित, भारतीय राजकारणी.
Post a Comment