१५ मार्च

१५ मार्च - दिनविशेष

व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर (१० डिसेंबर, इ.स. १८९२ - १५ मार्च, इ.स. १९३७; ग्वाल्हेर, ग्वाल्हेर संस्थान) हे मराठी रंगभूमीवर स्त्रीभूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक होते. बापूराव हे केशवराव भोसले ह्यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे अध्वर्यू होते.

जागतिक दिवस :

आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन

राष्ट्र दिन - हंगेरी.

ठळक घटना/घडामोडी :

१५४५ - ट्रेंटच्या समितीची पहिली बैठक.

१७८१ - अमेरिकन क्रांती - उत्तर कॅरोलिना राज्यातील सध्याच्या ग्रीनबोरो शहराजवळ चार्ल्स कॉर्नवॉलिसच्या १,९०० ब्रिटीश सैनिकांनी ४,४०० अमेरिकन सैनिकांना हरवले.

१८२० - मेन अमेरिकेचे २३वे राज्य झाले.

१८२७ - टोरोंटो विद्यापीठाची स्थापना.

१८७७ - इंग्लंड व ऑस्ट्रेलियात पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.

१९०६ - रोल्स रॉइस कंपनीची स्थापना.

१९१६ - अमेरिकेने मेक्सिकोच्या क्रांतिकारी पांचो व्हियाला पकडण्यासाठी आपले १२,००० सैनिक मेक्सिकोत घुसवले.

१९१७ - रशियाच्या झार निकोलस दुसर्‍याने सिंहासन सोडले.

१९२२ - फ्वाद पहिला इजिप्तच्या राजेपदी.

१९२६ - थियोडोरोस पँगालोसची ग्रीसच्या राष्ट्राध्यक्षपदी बिनविरोध निवड.

१९३९ - दुसरे महायुद्ध - जर्मनीने उरलेले चेकोस्लोव्हेकिया गिळंकृत केले.

१९४३ - दुसरे महायुद्ध-खार्कोव्हची लढाई - खार्कोव्ह शहर परत जर्मनीच्या ताब्यात.

१९४४ - दुसरे महायुद्ध-मॉँते कॅसिनोची लढाई - दोस्त राष्ट्रांनी मॉँते कॅसिनोच्या मठावर तुफान बॉम्बफेक केली व नंतर हल्ला चढवला.

१९५२ - रियुनियन बेटावरील सिलाओस गावात आजच्या एका दिवसात १,८७० मिलिमीटर (७३ इंच) इतका उच्चांकी पाउस पडला.

१९६१ - दक्षिण आफ्रिकाने ब्रिटीश राष्ट्रकुलातून अंग काढून घेतले.

१९९० - मिखाईल गोर्बाचेव्ह सोवियेत संघाच्या राष्ट्राध्यक्षपदी.

१९९० - सोवियेत संघाने लिथुएनियाचे स्वातंत्र्य नाकारले.

१९९१ - सोवियेत संघ, मिखाईल गोर्बाचेव्ह व दोस्त राष्ट्रांनी जर्मनीवरील आपला हक्क सोडला. जर्मनीला अधिकृतरीत्या स्वातंत्र्य.

२००३ - हू चिंताओ चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी.

जन्म/वाढदिवस :

१६३८ - शुंझी, चीनी सम्राट.

१७६७ - अँड्र्यू जॅक्सन, अमेरिकेचा ७वा राष्ट्राध्यक्ष.

१७७९ - विल्यम लॅम्ब, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

११४५ - पोप लुशियस दुसरा.

१९३७ - व्यंकटेश बळवंत पेंढारकर, मराठी नाट्य-अभिनेते, गायक.

१९७५ - एरिस्टॉटल ओनासिस, ग्रीक उद्योगपती.

१९९८ - डॉ. बेन्जामिन स्पॉक, अमेरिकन बालरोगतज्ञ.

२००६ - जॉर्ज रॅलिस, ग्रीसचा पंतप्रधान.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top