२० जानेवारी

जानेवारी २० - दिनविशेष

आंद्रे-मरी अँपियर (जानेवारी २०, इ.स. १७७५ - जून १०, इ.स. १८३६) हा फ्रांसचा भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होता. याने विद्युतचुंबकीयत्वाचा शोध लावला. विद्युतप्रवाहाच्या एककाला याचे नाव (अँपियर) देण्यात आले आहे.

जागतिक दिवस :

-

ठळक घटना/घडामोडी :

१८०१ - जॉन मार्शल अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी.

१८३९ - युंगेची लढई - चिली कडून पेरू व बॉलिव्हियाचा पराभव.

१८४० - विलेम दुसरा नेदरलँड्सच्या राजेपदी.

१८४१ - युनायटेड किंग्डमने हाँग काँगचा ताबा घेतला.

१९२१ - तुर्कस्तानचे पहिले संविधान अस्तित्त्वात आले.

१९३६ - एडवर्ड आठवा युनायटेड किंग्डमच्या राजेपदी.

१९३७ - फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टने अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली. यानंतरच्या सगळ्या अमेरिकन अध्यक्षांची सद्दी जानेवारी २०पासून सुरू होते. त्या यादी साठी येथे टिचकी द्या.

१९४२ - दुसरे महायुद्ध - बर्लिनमधील वॉन्सी परिषदेत नाझींनी ज्यूंच्या प्रश्नाचा शेवटचा उपाय ठरवला.

१९४४ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सने बर्लिन वर २,३०० टन बॉम्ब फेकले.

१९४५ - दुसरे महायुद्ध - हंगेरीने दोस्त राष्ट्रांशी शस्त्रसंधी केली.

१९५२ - एडगर फौ फ्रांसच्या पंतप्रधानपदी.

१९६९ - क्रॅब नेब्युलात प्रथमतः पल्सार दिसुन आला.

१९८१ - रोनाल्ड रेगनने अमेरिकन अध्यक्षपदाची शपथ घेतल्यावर काही मिनिटात ईराणने ओलिस धरलेल्या ५२ व्यक्तिंना सोडले.

जन्म/वाढदिवस :

१७१६ - चार्ल्स तिसरा, स्पेनचा राजा.

१७७५ - आंद्रे-मरी अँपियर, फ्रांसचा भौतिकशास्त्रज्ञ.

१७९८ - ऍन्सन जोन्स, टेक्सासच्या प्रजासत्ताकचा पाचवा व शेवटचा अध्यक्ष.

१८९६ - जॉर्ज बर्न्स, अमेरिकन अभिनेता.

१९०६ - ऍरिस्टॉटल ऑनासिस, ग्रीक उद्योगपती.

१९१५ - गुलाम इशाक खान, पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.

१९३० - बझ आल्ड्रिन, अमेरिकन अंतराळवीर.

१९४९ - गोरान पर्स्सन, स्वीडनचा पंतप्रधान.

१९५० - महामाने औस्माने, नायजरचा राष्ट्रध्यक्ष.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

१६१२ - रुडोल्फ दुसरा, पवित्र रोमन सम्राट.

१६६६ - ऑस्ट्रियाची ऍना, फ्रांसचा राजा लुई तेरावा याची पत्नी.

१७४५ - चार्ल्स सातवा, पवित्र रोमन सम्राट.

१८१९ - चार्ल्स चौथा, स्पेनचा राजा.

१८४८ - क्रिस्चियन आठवा, डेन्मार्कचा राजा.

१८९१ - डेव्हिड कालाकौआ, हवाईचा राजा.

१९३६ - जॉर्ज पाचवा, युनायटेड किंग्डमचा राजा. भारतात पंचम जॉर्ज नावाने प्रख्यात.

१९८८ - खान अब्दुल गफार खान, पश्तुन नेता, स्वातंत्र्यसेनानी.

१९९३ - ऑड्रे हेपबर्न, अँग्लो-डच अभिनेत्री.

२००५ - पर बोर्टेन, नॉर्वेचा पंतप्रधान.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top