
चंद्र मोहन जैन हे जन्मनाव असणारे, १९६० पासून आचार्य रजनीश म्हणून, १९७० व १९८० च्या दशकांमध्ये भगवान श्री रजनीश म्हणून आणि १९८९ पासून ओशो म्हणून ओळखले जाणारे ओशो (११ डिसेंबर १९३१ - १९ जानेवारी १९९०) हे आंतरराष्ट्रीय अनुयायी मिळवणारे भारतीय रहस्यवादी, गुरू आणि आध्यात्मिक शिक्षक होते. तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असणाऱ्या ओशोंनी १९६० च्या दशकात सार्वजनिक वक्ते म्हणून भारतभर प्रवास केला.
-
१९१५महायुद्ध - जर्मन झेपेलिननी ब्रिटनच्या ग्रेट यारमथ आणि किंग्ज लिन गावांवर बॉम्बफेक केली. हवेतून नागरी वस्तीवर हल्ला झाल्याची ही पहिलीच वेळ.
१९१८ - फिनीश गृहयुद्ध - लाल सैनिक व पांढरे सैनिक यांच्यात पहिली लढाई.
१९४१ - दुसरे महायुद्ध - ब्रिटनने एरिट्रिया वर हल्ला केला.
१९४२ - दुसरे महायुद्ध - जपानने म्यानमार वर हल्ला केला.
१९४५ - दुसरे महायुद्ध - रशियाने पोलंडमधील लोड्झ शहर नाझींपासून मुक्त केले. युद्धाच्या सुरूवातीला लोकसंख्या - २,३०,०००. या दिवशीची लोकसंख्या - ९००.
१९४६ - दुसरे महायुद्ध - जनरल डग्लस मॅकआर्थरने टोक्योमध्ये आंतरराष्ट्रीय सैनिकी न्यायालय सुरू केले.
१९५६ - देशातील सर्व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा राष्ट्रपतींचा वटहुकुम. त्यांचेच एकत्रित स्वरुपात आयुर्विमा महामंडळ झाले.
१९६६ - इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधानपदी.
१९७७ - मायामी, फ्लोरिडात पहिला आणि (आत्तापर्यंत) अखेरचा हिमवर्षाव.
१९९६ - ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा खाँ यांची शास्त्रीय संगीतासाठीच्या मध्य प्रदेश सरकारच्या कालिदास सन्मानासाठी निवड. तसेच प्रसिद्ध मल्याळी लेखक एम.टी. वासुदेवन नायर यांची १९९५ च्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड.
२००६ - स्लोव्हेकियन वायु सेनेचे ए.एन. २४ प्रकारचे विमान हंगेरीमध्ये कोसळले.
२००६ - नासाने न्यू होरायझन्स हे अंतराळयान प्लुटोकडे प्रक्षेपित केले.
२००६ - जेट एरवेझने एर सहारा विकत घेतले व भारतातील सगळ्यात मोठी विमान कंपनी झाली.
२००७ - सरदार सरोवर धरणावरील साडेचौदाशे मेगावॉट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला अर्पण केला.
१७३६ - जेम्स वॅट, स्कॉटिश शास्त्रज्ञ संशोधक.
१८०७ - रॉबर्ट ई. ली, अमेरिकन कॉन्फेडरेट सेनापती.
१८०९ - एडगर ऍलन पो, अमेरिकन लेखक.
१८१३ - सर हेन्री बेसेमेर, इंग्लिश संशोधक.
१८६८ - बॉब मॅकलिओड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१८९२ - चिंतामण विनायक जोशी, विनोदी लेखक व पाली भाषेचे अभ्यासक.
१९०६ - मास्टर विनायक, मराठी चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते.
१९२२ - आर्थर मॉरिस, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९३० - जॉन वाइट, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९६९ - महमूद हमीद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
१९०५ - देबेन्द्रनाथ टागोर, भारतीय तत्त्वज्ञानी.
१९५१ - अमृतलाल विठ्ठल ठक्कर, महात्मा गांधींचे अनुयायी.
१९६० - दादासाहेब तोरणे, मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक.
१९९० - आचार्य रजनीश, भारतीय तत्त्वज्ञानी.
२००४ - डेव्हिड हूक्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
Post a Comment