
मधू दंडवते (जानेवारी २१, इ.स. १९२४ - नोव्हेंबर १२, इ.स. २००५) हे भारतीय राजकारणी, अर्थतज्ञ व समाजसेवक होते. दंडवते इ.स. १९७१ ते इ.स. १९९० दरम्यान राजापूर मतदारसंघातून सलग पाच वेळा लोकसभा सदस्यपदी निवडले गेले. दंडवते मोरारजी देसाई यांच्या पंतप्रधानकाळात रेल्वेमंत्री होते. या काळात त्यांच्या पुढाकारामुळे रेल्वेच्या दुसऱ्या वर्गाचा प्रवास अनेक प्रकारे सुखावह झाला.
-
१६६२ - शिवरायांनी तळकोकण काबीज केले.
१९५४ - नॉटिलस या अणुउर्जेवर चालण्याऱ्या जगातील पहिल्या पाणबुडीचे जलावतरण.
१९७२ - मणिपूर व मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
१९९९ - जर्मन सरकारच्या 'फोरम ऑफ आर्ट ऍंड एक्झिबिशन' ने १९९९ च्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी विख्यात सतारवादक पं. रवी शंकर यांची निवड केली.
२००० - 'फायर ऍंड फरगेट' या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताकडून यशस्वी चाचणी.
२००३ - राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्यांना अधिक कठोर शिक्षा करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय.
१८९४ - माधव त्र्यंबक पटवर्धन ऊर्फ माधव ज्युलियन, मराठी कवी.
१८९८ - मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, अभिनेते, संगीतकार.
१९२४ - प्रा.मधू दंडवते, माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ समाजवादी नेते.
१९४५ - रासबिहारी बोस, स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक नेते.
१९९८ - एस.एन.कोहली, माजी नौदलप्रमुख ॲडमिरल.
Post a Comment