६ फेब्रुवारी

फेब्रुवारी ६ - दिनविशेष

अयोध्येचा राजा हा ६ फेब्रुवारी इ.स. १९३२ रोजी प्रदर्शित झालेला मराठी भाषेतील बोलपट होता. हा मराठीत बनलेला पहिला बोलपट आहे. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली. गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या होत्या.

जागतिक दिवस :

वैतंगी दिन - न्यू झीलंड.

बॉब मार्ली दिन - जमैका, इथियोपिया.

ठळक घटना/घडामोडी :

१७८८ - मॅसेच्युसेट्सने अमेरिकेचे संविधान मान्य केले.

१८१९ - सर थॉमस स्टॅमफर्ड रॅफल्सने सिंगापुरची स्थापना केली.

१८४० - वैतंगीचा तह. न्यू झीलंड राष्ट्र म्हणून अस्तित्त्वात.

१९२२ - अकिल रॅट्टी पोप पायस अकरावा झाला.

१९३२ - कोलकाता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात वीणा दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळ्या झाडल्या.

१९३२ - प्रभात कंपनीचा अयोध्येचा राजा (चित्रपट) हा पहिला मराठी बोलपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

१९३६ - जर्मनीत गार्मिश-पार्टेनकर्केन येथे चौथे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.

१९५१ - न्यू जर्सीत वूडब्रिज टाउनशिप येथे रेल्वे रुळावरून घसरली. ८५ ठार, ५०० जखमी.

१९५२ - इंग्लंडचा राजा जॉर्ज सहाव्याचा अंत. एलिझाबेथ दुसरी राणी झाली. ज्याक्षणी एलिझाबेथ राणी झाली (जॉर्जचा मृत्यु) त्या क्षणी ती केन्यातील झाडावर असलेल्या हॉटेलमध्ये होती.

१९५९ - टेक्सास इन्स्ट्‌रुमेन्ट्सच्या जॅक किल्बीने इंटिग्रेटेड सर्किटसाठी पहिला पेटंट घेतला.

१९६८ - फ्रांसमध्ये ग्रेनोबल येथे दहावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.

१९९६ - टर्किश एअरलाइन्सचे बोईंग ७५७ जातीचे विमान डॉमिनिकन प्रजासत्ताक जवळ अटलांटिक समुद्रात कोसळले. १८९ ठार.

२००१ - सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास आणि तंबाखूपासून बनविण्यात आलेल्या सर्व उत्पादनांची जाहिरात करण्य़ावर बंदी घालणार्‍या 'तंबाखू उत्पादने' विधेयकाला भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.

२००१ - पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असलेल्या चर्चगेटच्या इमारतीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याबद्दल डाक विभागातर्फे टपाल तिकीट प्रसिद्ध.

२००३ - संत तुकाराम महाराज यांचे चित्र असलेल्या नाण्याचे प्रकाशन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा हस्ते करण्यात आले.

२००४ - चेचेन अतिरेक्यांनी रशियात मॉस्कोतील रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून आणला. ४० ठार.

जन्म/वाढदिवस :

१६९५ - निकोलस बर्नोली, स्विस गणितज्ञ.

१८७६ - सेलर यंग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१८८२ - गॉर्डन व्हाइट, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

१८८९ - एलियास हेन्ड्रेन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१८९५ - जॉर्ज हर्मन रुथ, जुनियर, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.

१९११ - रोनाल्ड रेगन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.

१९१२ - ॲव्हा ब्राउन, ऍडोल्फ हिटलरची सोबतीण.

१९३९ - ब्रायन लकहर्स्ट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९४५ - बॉब मार्ली, जमैकन संगीतकार.

१९७० - डॅरेन लेहमान, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

१९७६ - टोनी सुजी, केन्याचा क्रिकेट खेळाडू.

१९८६ - ब्रॅन्डन टेलर, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

१५९३ - ओगिमाची, जपानी सम्राट.

१६८५ - चार्ल्स दुसरा, इंग्लंडचा राजा.

१७४० - पोप क्लेमेंट बारावा.

१८९९ - लिओ फोन कॅप्रिव्ही, जर्मनीचा चॅन्सेलर.

१९१८ - गुस्टाफ क्लिम्ट, ऑस्ट्रियन चित्रकार.

१९३१ - पंडित मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडिल.

१९३९ - सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे महाराज.

१९५२ - जॉर्ज सहावा, इंग्लंडचा राजा.

१९६४ - एमिलियो अग्विनाल्दो, फिलिपाईन्सचा पहिला राष्ट्राध्यक्ष.

१९७६ - ऋत्विक घटक, चित्रपट निर्माते.

१९८९ - चार्ल्स गुफ्फ्रोय, बर्लिनची भिंत ओलांडताना मृत्यू पत्करणारा शेवटचा माणूस.

१९९३ - आर्थर अ‍ॅश, अमेरिकन टेनिसपटू.

२००१ - बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top