२८ फेब्रुवारी

फेब्रुवारी २८ - दिनविशेष

राष्ट्रीय विज्ञान दिन डॉ. सी. व्ही. रमण यांनी त्यांचे विकिद्रणाबद्दलचे संशोधन (रामन परिणाम) या दिवशी जाहीर केले . पुढे त्यांना त्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले. म्हणून हा दिवस ’राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून पाळला जातो.

जागतिक दिवस :

राष्ट्रीय विज्ञान दिवस - भारत

शांति स्मृति दिन - तैवान.

ठळक घटना/घडामोडी :

१७८४ - जॉन वेस्लीने मेथोडिस्ट चर्चची स्थापना केली.

१८४९ - अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू. न्यूयॉर्कहून निघालेले एस. एस. कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सान फ्रांसिस्कोला पोचले.

१८५४ - रिपन, विस्कॉन्सिन येथे अमेरिकन रिपब्लिकन पार्टीची स्थापना.

१८६१ - कॉलोराडोला अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा प्रदेश म्हणून मान्यता.

१८९७ - फ्रांसच्या सैन्याने मादागास्करची राणी रानाव्हलोना तिसरी हिला पदच्युत केले.

१९२२ - इजिप्तला युनायटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य.

१९३१- राष्ट्रीय विज्ञान दिन डॉ. सी. व्ही. रमण यांनी त्यांचे विकिद्रणाबद्दलचे संशोधन (रामन परिणाम) या दिवशी जाहीर केले . पुढे त्यांना त्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळाले. म्हणून हा दिवस ’राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून पाळला जातो.

१९३५ - वॉलेस केरोथर्सने नायलॉनचा शोध लावला.

१९४७ - तैवानमध्ये आंदोलकांवर पोलिसांचा गोळीबार. शेकडो व्यक्ति ठार.

१९७५ - लंडनमध्ये भुयारी रेल्वेला अपघात. ४३ ठार.

१९८६ - स्वीडनच्या पंतप्रधान ओलोफ पाल्मेची हत्या.

१९९३ - वेको, टेक्सास येथील ब्रांच डेव्हिडयन धर्माच्या वसाहतीवर पोलिसांची धाड. ५ ठार.

२००१ - अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यात रिश्टर मापनपद्धतिनुसार ६.८ तीव्रतेचा भूकंप.

२००२ - गुजरातमध्ये जातीय दंगली. ५५ मृत्यू.

जन्म/वाढदिवस :

१९२६ - स्वेतलाना अलिलुयेवा, जोसेफ स्टालिनची मुलगी.

१९३५ - क्लाइव्ह हाल्से, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

१९४६ - ग्रॅहाम व्हिवियन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.

१९४७ - दिग्विजय सिंघ, भारतातील मध्यप्रदेश राज्याचे पूर्व मुख्यमंत्री आणि भारतीय राष्ट्रीय कांग्रेस चे नेते.

१९४७ - विजय बहुगुणा, भारतातील उत्तराखंड राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.

१९५१ - करसन घावरी, भारतीय क्रिकेट खेळाडू.

१९६९ - यू. श्रीनिवास, मेंडोलिन वादक, सप्टेंबर १३ २००३ रोजी त्यांना राष्ट्रीय कुमार गंधर्व पुरस्कार जाहीर झाला.

१९७१ - परमजीत सिंघ, भारतीय खेळाडू, यांनी ४०० मीटर शर्यतीचा ३८ वर्षांचा मिल्खा सिंघ चा राष्ट्रीय रेकॉर्ड मोडला.

१९७५ - अझहर महमूद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

१९७८ - राणा नवेद-उल-हसन, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

१९७८ - यासिर हमीद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

१५२५ - क्वाह्टेमॉक, ऍझटेक सम्राट.

१६४८ - क्रिस्चियन चौथा, डेन्मार्कचा राजा.

१८६९ - आल्फोन्स द लामार्टीन, फ्रेंच कवी, लेखक, राजकारणी.

१९२५ - फ्रिडरिश एबर्ट, जर्मनीचा चान्सेलर.

१९३६ - कमला नेहरू, जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी.

१९४१ - आल्फोन्सो तेरावा, स्पेनचा राजा.

१९६३ - डॉ. राजेंद्र प्रसाद, भारताचे प्रथम राष्ट्रपती.

१९७९ - पाउल आल्वेर्डेस, जर्मन कवी, लेखक.

१९८६ - ओलोफ पाल्मे, स्वीडनचा पंतप्रधान.

२००३ - फिदेल सांचेझ हर्नान्देझ, एल साल्वादोरचा राष्ट्राध्यक्ष.

२००६ - ओवेन चेंबरलेन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top