
भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया `बोलत्या' व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे
हरी नारायण आपटे, अर्थात ह.ना. आपटे, (मार्च ८, इ.स. १८६४ - मार्च ३, इ.स. १९१९) हे मराठी लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी व व्याख्याते होते. ते करमणूक व ज्ञानप्रकाश या मासिकांचे काही काळ संपादक, आनंदाश्रम या प्रकाशनसंस्थेचे व्यवस्थापक, आणि करमणूक या मासिकाचे संस्थापक-संपादक होते.
जागतिक महिला दिन.
मातृ दिन - आल्बेनिया.
धुम्रपान निषिद्ध दिन - युनायटेड किंग्डम.
१६१८ - योहान्स केप्लरने ग्रहभ्रमणाचा तिसरा नियम शोधला.
१७०२ - ॲन स्टुअर्ट इंग्लंडच्या राणीपदी.
१७८२ - ग्नाडेहुटेनची कत्तल - ओहायोत ग्नाडेहुटेन येथे पेनसिल्व्हेनियाच्या नागरी दलाने १०० स्थानिक अमेरिकन माणसांची डोके फोडून हत्या केली.
१८४४ - ऑस्कर पहिला नॉर्वे व स्वीडनच्या राजेपदी.
१९०६ - अमेरिकेच्या सैन्याने फिलिपाईन्समध्ये लपून बसलेल्या ६०० लोकांची कत्तल केली.
१९११ - जागतिक महिला दिन पहिल्यांदा मानला गेला.
१९२१ - माद्रिदमध्ये स्पेनच्या पंतप्रधान एदुआर्दो दातोची संसदेबाहेर हत्या.
१९४२ - दुसरे महायुद्ध - जावामध्ये नेदरलँड्सच्या सैन्याने जपान समोर शरणागती पत्करली.
१९४२ - दुसरे महायुद्ध - जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकले.
१९४३ - दुसरे महायुद्ध-बोगनव्हिलची लढाई - जपानी सैन्याने प्रतिहल्ला सुरु केला.
१९४८ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की सरकारी शाळांमधून धर्माचे शिक्षण देणे अमेरिकेच्या संविधानाच्या विरुद्ध आहे.
१९४८ - महाराष्ट्रातील फलटण हे सस्थान भारतीय गणराज्यात सामील झाले.
१९५० - सोवियेत संघाने आपल्याकडे अणुबॉम्ब असल्याचे जाहीर केले.
१९५२ - आँत्वान पिनॉय फ्रान्सच्या पंतप्रधानपदी.
१९६५ - सुमारे ३,५०० अमेरिकन मरीन दक्षिण व्हियेतनाममध्ये दाखल.
१९८५ - बैरूतमध्ये एका मशिदीसमोर बॉम्बस्फोट. ८५ ठार, १७५ जखमी.
१९८८ - फोर्ट कॅम्पबेल, केन्टकी येथे दोन हेलिकॉप्टरची टक्कर. १७ सैनिक ठार.
२००० - टोकियोत दोन लोकल गाड्यांची टक्कर. ५ ठार.
१५१४ - आमागो हारुहिसा, जपानी सामुराई.
१५४५ - यी सुन सिन, कोरियन दर्यासारंग.
१७२६ - रिचर्ड होव, इंग्लिश दर्यासारंग.
१८४१ - ऑलिव्हर वेन्डेल होम्स, अमेरिकन न्यायाधीश.
१८६४ - मराठीतील जेष्ठ कादंबरीकार हरी नारायण आपटे.
१९३१ - नील ऍडकॉक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९३७ - जुवेनाल हब्यारिमाना, र्वान्डाचा राष्ट्राध्यक्ष.
१९४५ - ग्रेम वॅट्सन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९४६ - मोहम्मद नझीर, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
१९५१ - फिल एडमंड्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९५७ - अर्विन मॅकस्वीनी, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
१९६१ - केव्हिन आर्नॉट, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
१९६३ - गुरशरणसिंघ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९८१ - रायाड एम्रिट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
१९८४ - रॉस टेलर, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
१७०२ - विल्यम तिसरा, इंग्लंडचा राजा.
१८४४ - चार्ल्स चौदावा, स्वीडनचा राजा.
१८७४ - मिलार्ड फिलमोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
१९२३ - योहान्स डिडरिक व्हान डेर वाल्स, डच भौतिकशास्त्रज्ञ.
१९३० - विल्यम हॉवार्ड टाफ्ट, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
१९८८ - अमरसिंग चमकिला, पंजाबी गायक.
१९९९ - ज्यो डिमाजियो, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
Post a Comment