
डॉ. दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे (३१ जानेवारी, इ.स. १८९६; धारवाड, ब्रिटिश भारत - २१ ऑक्टोबर, इ.स. १९८१; मुंबई, महाराष्ट्र) हे कन्नड भाषेतील ख्यातनाम कवी होते. ते अंबिकातनयदत्त (अंबिकेचा पुत्र - दत्त) या टोपणनावाने लिहीत. कन्नड कविता व नाटकांशिवाय त्यानी मराठी साहित्यकृतींचे कन्नड भाषेत अनुवादही केले. नवोदय युगातील कन्नड काव्यातले त्यांचे योगदान पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९६८) व ज्ञानपीठ पुरस्कार (इ.स. १९७४) देऊन गौरवण्यात आले.
स्वातंत्र्य दिन - नौरू.
१९१५ - पहिले महायुद्ध - जर्मनीने रशियाच्या सैन्याविरुद्ध विषारी वायुचा उपयोग केला.
१९२९ - सोवियेत संघाने लिओन ट्रोट्स्कीला हद्दपार केले.
१९२० -डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी `मूकनायक’ या पाक्षिकाची सुरुवात केली.
१९३० - ३एम या अमेरिकन कंपनीने स्कॉच टेप विकायला सुरुवात केली.
१९४५ - अमेरिकेने एडी स्लोव्हिक या सैनिकाला युद्धतून पळ काढल्याबद्दल मृत्युदंड दिला.
१९४९ - बडोदा व कोल्हापूर ही दोन्ही संस्थाने मुंबई राज्यात विलीन झाली.
१९५० - राष्ट्रपती म्हणून डॉ.राजेंद्रप्रसाद यांचे संसदेपुढे पहिले भाषण. त्यापूर्वी ते घटना समितीचे अध्यक्ष होते.
१९५३ - नेदरलँड्समध्ये पूर. १,८०० ठार.
१९५६ - गाय मोले फ्रांसच्या पंतप्रधानपदी.
१९५८ - अमेरिकेच्या पहिला कृत्रिम उपग्रह एक्स्प्लोरर १ ने पृथ्वीप्रदक्षिणा सुरू केली.
१९६८ - व्हियेतकाँग ने सैगोनमधील अमेरिकन राजदूतावासावर हल्ला केला.
१९६८ - नौरूला ऑस्ट्रेलिया पासून स्वातंत्र्य.
१९७१ - अपोलो १४ चंद्राकडे निघाले.
१९९२ - ६५ वे साहित्य संमेलन कोल्हापूर येथे झाले.
१९९६ - अतिरेक्यांनी श्रीलंकेत कोलंबोमध्ये स्फोटके भरलेला ट्रक मध्यवर्ती बँकेच्या दारावर उडवला. ८६ ठार. १,४०० जखमी.
२००० - अलास्का एरलाइन्सचे एम.डी.८३ जातीचे विमान कॅलिफोर्नियात मालिबु जवळ कोसळले. ८८ ठार.
१८८५ - ऍना पावलोव्ह, विख्यात रशियन नर्तिका.
१८९६ - दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड महाकवी.
१९०२ - स्विडनमधील प्रसिध्द समाजसेविका व जागतिक नि:शस्त्रीकरणाच्या खंबीर पुरस्कर्त्या ‘मिर्दाल अल्बा’.
१९३१ - गंगाधर महांबरे, ज्येष्ठ संगीतकार.
१९३८ - बियाट्रिक्स, नेदरलँड्सची राणी.
१९७५ - प्रिती झिंटा, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
१७८८ - चार्ल्स एडवर्ड स्टुअर्ट, इंग्लंडचा स्वयंघोषित राजा.
१८१५ - होजे फेलिक्स रिबास, व्हेनेझुएलाचा स्वातंत्र्यसैनिक.
१९७२ - महेंद्र, नेपाळचा राजा.
१९९४ - वसंत जोगळेकर, मराठी व हिंदी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक.
२००० - के.एन.सिंग, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते.
२००४ - सुरैय्या, ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री.
२००६ - कोरेटा स्कॉट किंग, मार्टिन ल्युथर किंगची पत्नी.
Post a Comment