
ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी हा इंग्रजी भाषेतील सुप्रसिद्ध शब्दकोश आहे.या शब्दकोशाचा पहिला खंड फेब्रुवारी १ १८८४ रोजी प्रसिद्ध झाला.त्यावेळी 'अ न्यू इंग्लिश डिक्शनरी ऑन हिस्टॉरिकल प्रिन्सिपल्स; फाऊंडेड मेनली ऑन द मटेरियल्स कलेक्टेड बाय द फिलॉलॉजिकल सोसायटी' असे त्याचे लांबलचक नाव होते. पहिल्या ३५२ शब्दांच्या खंडात 'ए' पासुन 'ऍंट' पर्यंतच्या शब्दांचा समावेश होता. पुढे हळूहळू या कोशात शब्दांची भर पडत गेली आणि संपूर्ण एकत्रित शब्दकोश तयार होण्यास एप्रिल १९ १९२८ ही तारीख उजाडली. १९३३ मध्ये या शब्दकोशाला ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी असे नाव मिळाले.
कल्पना चावला (मार्च १७ इ.स. १९६२:कर्नाल, हरयाणा -- फेब्रुवारी १ इ.स. २००३:टेक्सासवर अंतराळात) ही अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती. १ फेब्रुवारी २००३ या दिवशी अवकाशातून पृथ्वीवर परत येणार्या कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाला. या स्फोटामुळे कोलंबियाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. या यानामध्ये असलेल्या कल्पना चावला यांचा आणि अन्य अंतराळवीरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
-
१८१४ - फिलिपाईन्सच्या मेयोन ज्वालामुखीचा उद्रेक १,२०० ठार.
१८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - टेक्सास अमेरिकेपासून विभक्त झाले.
१८८४ - ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीची पहिली आवृत्ती प्रकाशित. तेव्हापासून ऑक्सफर्डच्या कोशांचे काम अव्याहतपणे चालूच आहे.
१९०८ - पोर्तुगालचा राजा कार्लोस पहिला व राजकुमार लुइस फिलिपेची हत्या.
१९२० - कॅनडात रॉयल केनेडियन माउंटेड पोलिस तथा माउंटीज् या पोलिस संघटनेची स्थापना.
१९४३ - दुसरे महायुद्ध - नाझी सैन्याने व्हिडकुन क्विस्लिंगला नॉर्वेच्या पंतप्रधानपदी बसवले.
१९४६ - नॉर्वेच्या त्रिग्वे लीची संयुक्त राष्ट्रांच्या प्रथम सरचिटणीस पदी निवड.
१९७४ - साओ पाउलो, ब्राझिलमध्ये कार्यालये असलेल्या ईमारतीला आग. १८९ ठार, २९३ जखमी.
१९७९ - रुहोल्ला खोमेनी १५ वर्षांनी परत ईराणमध्ये आला.
१९८१ - ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंडमधील क्रिकेट एक दिवसीय सामन्यात शेवटच्या चेंडुवर न्यू झीलंडला ६ धावा हव्या असताना ग्रेग चॅपलने आपला भाउ ट्रेव्हर चॅपलला अंडरआर्म फेकी करण्यास सांगितले. ट्रेव्हरने तसे केले, ऑस्ट्रेलिया सामना जिंकले परंतु यानंतर अंडरआर्म फेकी बेकायदा ठरवण्यात आली.
१९९१ - लॉस एंजेलस आंतरराष्ट्रीय विमानतळावर यु.एस. एरचे विमान दुसर्या छोट्या विमानाला धडकले. ३५ ठार.
१९९२ - भोपाळच्या मुख्य न्यायाधीशांनी युनियन कार्बाइडचा मुख्य अधिकारी वॉरेन अँडरसनला फरारी घोषित केले.
२००२ - आयर्लंडमधील शांतता प्रक्रियेला चालना देणार्या 'गुड फ्रायडे' कराराचे शिल्पकार जॉन ह्यूम यांना राष्ट्रपती के.आर.नारायणन यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा गांधी शांतता पुरस्कार प्रदान.
२००३ - अंतराळातून परतताना स्पेस शटल कोलंबियाचा स्फोट. सात अंतराळवीर मृत्युमुखी.
२००४ - मक्केत हज चालु असताना चेंगराचेंगरीत २४४ ठार.
१८८१ - टिप स्नूक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१८८२ - लुई स्टीवन सेंट लॉरें, कॅनडाचा १२वा पंतप्रधान.
१८८४ - सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, प्राच्यविद्यापंडित, मराठी कोशकार.
१९०१ - क्लार्क गेबल, अमेरिकन अभिनेता.
१९०४ - बा.रा.घोलप, शिक्षणमहर्षी.
१९१० - जहांगीर खान, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९२२ - क्लिफर्ड मॅकवॉट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
१९३० - शहाबुद्दीन अहमद, बांगलादेशी राष्ट्राध्यक्ष.
१९३१ - बोरिस येल्त्सिन, रशियन राष्ट्राध्यक्ष.
१९३१ - इयाजुद्दीन अहमद, बांगलादेशी राष्ट्राध्यक्ष.
१९४२ - डेव्हिड सिनकॉक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९५० - नसीर मलिक, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
१९५८ - जॅकी श्रॉफ, भारतीय चित्रपट अभिनेता.
१९६५ - डेव्ह कॅलाहन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९६९ - महबुबुर रहमान, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.
१९७१ - अजय जडेजा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९७२ - कर्टली ऍम्ब्रोझ, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
१९८१ - ग्रेम स्मिथ, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९८२ - शोएब मलिक, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
१९०८ - कार्लोस पहिला, पोर्तुगालचा राजा.
१९८१ - डोनाल्ड विल्स डग्लस, सिनियर, अमेरिकन विमानतंत्रज्ञ.
१९९५ - मोतीराम गजानन रांगणेकर, मराठी नाटककार.
२००३ - स्पेस शटल कोलंबियातील अंतराळवीर - ( मायकेल पी. अँडरसन, डेव्हिड ब्राउन, कल्पना चावला, लॉरेल क्लार्क, रिक डी. हसबंड, विली मॅककूल, इलान रमोन ).
Post a Comment