
गॅलेलियो गॅलिली (जन्म: फेब्रुवारी १५, इ.स. १५६४; मृत्यु: जानेवारी ८, इ.स. १६४२) हा इटलीचा भौतिकशास्त्रज्ञ गणितज्ञ व तत्त्वज्ञ होता. गॅलेलियोचा जन्म १५ फेब्रुवारी १५६४ रोजी झाला. त्याच वर्षी विल्यम शेक्सपियरही जन्मला होता आणि मायकल ॲन्जेलो मरण पावला होता. गॅलेलियोच्या सात भावंडापैकी तो सगळ्यात मोठा. त्याचे वडील मोठे संगीतकार होते. त्यांनीच त्याला स्वतंत्रपने विचार करायला शिकवल.
डॉ. नारायण भिकाजी परुळेकर, ऊर्फ नानासाहेब परुळेकर, (सप्टेंबर २०, इ.स. १८९७ - जानेवारी ८, इ.स. १९७३) हे 'सकाळ'चे संस्थापक-संपादक होते. पत्रकारितेतील कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने गौरविले होते. 'निरोप घेता' नावाचे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे.
-
२००४ - आर.एम.एस. क्वीन मेरी २ या जगातील सगळ्यात मोठे प्रवासी जहाजाचे इंग्लंडची राणी एलिझाबेथ दुसरी हिच्याकडून नामकरण.
२००५ - अणुऊर्जावर चालणारी यु.एस.एस. सान फ्रांसिस्को (एस.एस.एन.०७७१) ही पाणबुडी पाण्याखाली पूर्णवेगात असताना समुद्रातील डोंगराशी धडकली. एक खलाशी ठार. पाणबुडी पृष्ठभागावर येण्यात यशस्वी.
२००६ - ग्रीसच्या कायथिरा बेटाजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.९ तीव्रतेचा भूकंप.
२००६ - मराठी साहित्यिक विंदा करंदीकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
१९०२ - जॅक इड्डॉन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९०९ - ब्रुस मिचेल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९०९ - आशापूर्णादेवी- ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणार्या प्रथम लेखिका.
१९१३ - डेनिस स्मिथ, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
१९२३ - जॉनी वॉर्डल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९४२ - जुनिचिरो कोइझुमी, जपानी पंतप्रधान.
१९४२ - स्टीफन हॉकिंग, गणितज्ञ व इंग्लिश लेखक.
१९४५ - प्रभा गणोरकर- मराठी लेखिका.
१९४७ - इेविहड बॉविए
१९४९ - लॉरेंस रोव, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
१९५१ - केनी अँथनी, सेंट लुशियाचा पंतप्रधान.
१९६१ - शोएब मोहम्मद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
१९६५ - चंपक रमानायके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
४८२ - संत सेव्हेर्नियस.
११०० - प्रतिपोप क्लेमेंट तिसरा.
११०७ - एडगर, स्कॉटलंडचा राजा.
११९८ - पोप सेलेस्टीन तिसरा.
१३२४ - मार्को पोलो, इटालियन शोधक.
१६४२ - गॅलेलियो गॅलिली, इटालियन गणितज्ञ , इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.
१९६७ - श्रीपाद कृष्ण बेलवलकर- प्राच्यविद्यापंडित.
१९७३ - नारायण भिकाजी परुळेकर ऊर्फ नानासाहेब परुळेकर, मराठी पत्रकार.
१९७३ - स.ज. भागवत -तत्त्वज्ञ व विचारवंत.
१९७६ - चाउ एन्लाय, चीनी पंतप्रधान.
१९९२ - द.प्र. सहस्रबुद्धे- 'आनंद' मासिकाचे माजी संपादक.
१९९६ - फ्रांस्वा मित्तरॉँ, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
Post a Comment