२२ फेब्रुवारी

फेब्रुवारी २२ - दिनविशेष

कस्तुरबा गांधी (११ एप्रिल,१८६९ ते २२ फेब्रुवारी, १९४४) या महात्मा गांधी यांच्या पत्नी होत्या. त्यांना प्रेमाने बा असे संबोधले जायचे. गोकुळदास माखजी या पोरबंदर येथील श्रीमंत व्यापाऱ्याच्या घरी जन्मलेल्या कस्तुरबांचा विवाह मोहनदास करमचंद गांधी यांच्याशी झाला. लग्नाच्या वेळी दोघांचेही वय १३ वर्षे होते. लग्नसमयी त्या निरक्षर होत्या- त्यांना गांधीजींनी लिहावाचायला शिकवले. त्यावेळच्या स्त्रियांच्या स्थितीचा विचार करता ही एक धक्कादायक गोष्ट होती.

डॉ. लक्ष्मण देशपांडे (डिसेंबर ५, इ.स. १९४३ - फेब्रुवारी २२, इ.स. २००९) एक बहुरंगी मराठी लेखक, नाट्यदिग्दर्शक व अभिनेते होते. मराठवाड्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख असणारे डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव आहे. हा बहुमान त्यांना वऱ्हाड निघालय लंडनला ह्या एकपात्री नाटकासाठी मिळाला. ह्या नाटकाचा पहिला प्रयोग त्यांनी इ.स. १९७९ मध्ये केला होता. तेव्हापासून आतापर्यंत याच नाटकाचे १,९६० पेक्षा अधिक प्रयोग सादर करण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. ह्या तीन तासांच्या एकपात्री प्रयोगात ते ५२ रूपे सादर करायचे.

जागतिक दिवस :

स्वातंत्र्य दिन - सेंट लुशिया.

ठळक घटना/घडामोडी :

१४९५ - फ्रांसचा चार्ल्स आठव्याने नेपल्सचे राज्य बळकावले.

१७४४ - तुलोनची लढाई सुरू.

१८१९ - स्पेनने फ्लोरिडाचा प्रदेश अमेरिकेला ५०,००,००० अमेरिकन डॉलरच्या मोबदल्यात विकला.

१८४७ - बोयना व्हिस्ताची लढाई - अमेरिकेच्या ५,००० सैनिकांनी मेक्सिकोच्या १५,००० सैनिकांना पळवून लावले.

१८५७ - रत्नागिरीत ’पतित पावन’ मंदिरांची स्थापना झाली.

१८६५ - टेनेसीने नवीन संविधान अंगिकारले व गुलामगिरी बेकायदा ठरवली.

१८८९ - उत्तर डाकोटा, दक्षिण डाकोटा, मॉँटाना व वॉशिंग्टन अमेरिकेची राज्ये झाली.

१९३१ - स्वा. सावरकर व भागोजी शेठ यांच्या पुढाकाराने अस्पृश्यादी सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतितपावन मंदिर व देवालयाची स्थापना

१९४२ - दुसरे महायुद्ध - फिलिपाईन्समध्ये पराभव अटळ दिसताना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टने जनरल डग्लस मॅकआर्थरला माघार घ्यायचा हुकुम दिला.

१९४८ - चेकोस्लोव्हेकियात क्रांति सुरू.

१९५४ - पहिली कापड गिरणी मुंबईत सुरु

१९७९ - सेंट लुशियाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.

१९८० - बर्फावरील चमत्कार - लेक प्लॅसिड येथे तेराव्या हिवाळी ऑलिंपिक खेळात अमेरिकेच्या आइस हॉकी संघाने बलाढ्य अश्या सोवियेत संघाला हरवले.

२००२ - एम.एच.४७-ई जातीचे हेलिकॉप्टर फिलिपाईन्सजवळ समुद्रात कोसळले. १० ठार.

जन्म/वाढदिवस :

१४०३ - चार्ल्स सातवा, फ्रांसचा राजा.

१७३२ - जॉर्ज वॉशिंग्टन, अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष.

१८५७ - रॉबर्ट बेडेन-पॉवेल, बॉय स्काउट्सचा संस्थापक.

१८५७ - हाइनरिक हर्ट्झ, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.

१८५९ - जॉर्ज पामर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

१८८९ - ओलाव बेडेन-पॉवेल, गर्ल गाईड्सची संस्थापिका.

१९१७ - जॅक रॉबर्टसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९१८ - रॉबर्ट वाडलो, ८ फूट ११ ईंच (२७२ से.मी.) उंचीचा जगातील सगळ्यात उंच पुरूष.

१९२१ - जीन-बेडेल बोकासा, मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.

१९४१ - हिपोलितो मेजिया, डोमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.

१९४४ - रणजित फर्नान्डो, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

१९६३ - विजय सिंग, फिजीचा गोल्फ खेळाडू.

१९६३ - डेव्हन माल्कम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९८३ - शॉन टेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

१३७१ - डेव्हिड दुसरा, स्कॉटलंडचा राजा.

१९२१ - सलीम अल-मुबारक अल-सबाह, कुवैतचा अमीर.

१९४४ - महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी.

२००९ - डॉ.लक्ष्मण देशपांडे, मराठी लेखक, दिग्दर्शक व कलाकार.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top