
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन दर वर्षी फेब्रुवारी २१ साजरा केला जातो. १७ नोव्हेंबर १९९९ ला युनेस्को ने हा दिवस "आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन" म्हणून जाहीर केला.
जीन लुईस काल्मेंट (२१ फेब्रुवारी, इ.स. १८७५ – ४ ऑगस्ट, इ.स. १९९७) ही जगातील सगळ्यात जास्त दिवस जगलेली व्यक्ती होती. हिचे मृत्यूच्या वेळचे वय १२२ वर्षे व १६४ दिवस होते. हा जागतिक उच्चांक आहे.
डॉ. शांतिस्वरूप भटनागर (जन्म : शाहपूर (आता पाकिस्तानात) २१ फेब्रुवारी १८९४, मृत्यू : १ जानेवारी १९५५) हे भारतीय रसायनशास्त्रज्ञ होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताचा औद्योगिक विकास होण्याच्या दृष्टीने भारतात राष्ट्रीय प्रयोगशाळांची आणि वैज्ञानिक संशोधन केंद्रांची मालिका स्थापन करण्यात भटनागर यांनी बहुमोल कामगिरी केली. कौन्सिल ऑफ सायन्टिफिक ॲन्ड इंडस्ट्रियल रिसर्च (सी.एस.आय.आर.)चे ते शिल्पकार होते.
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन.
भाषा दिन - बांगलादेश.
१८०४ - जगातील पहिले वाफेवर चालणारे रेल्वे ईंजिन वेल्समधील पेन-इ-डॅरेन आयर्नवर्क्स या कारखान्यात तयार झाले.
१८४२ - जॉन जे. ग्रीनॉने शिवणाच्या मशीनचा पेटंट घेतला.
१८४८ - कार्ल मार्क्सने साम्यवादी जाहीरनामा(कम्युनिस्ट मॅनिफेस्टो) प्रकाशित केला.
१८७८ - न्यू हेवन, कनेक्टिकटमध्ये पहिली टेलिफोन डिरेक्टरी(<--प्रतिशब्द पाहिजे) वितरीत केली गेली.
१८८५ - वॉशिंग्टन डी.सी.मध्ये वॉशिंग्टन स्मारकाचे उद्घाटन.
१९१६ - पहिले महायुद्ध - व्हर्दुनची लढाई सुरू.
१९४७ - एडविन लँडने पोलेरॉईड कॅमेर्याचे प्रात्यक्षिक दाखवले.
१९५२ - इंग्लंडमध्ये नागरिकांनी ओळखपत्र नेहमी जवळ बाळगायची सक्ती रद्ध.
१९५२ - पूर्व पाकिस्तान(आताचे बांगलादेश)मध्ये पोलिसांनी विद्यार्थ्यांवर गोळीबार केला. चार ठार. येथून बांगलादेश मुक्ति आंदोलन सुरू झाले.
१९५३ - फ्रांसिस क्लार्क व जेम्स डी. वॅट्सननी डी.एन.ए.च्या रेणूची रचना शोधली.
१९६० - क्युबात फिदेल कास्त्रोने सगळ्या उद्योगांचे राष्ट्रीयीकरण केले.
१९६५ - न्यूयॉर्क मध्ये नेशन ऑफ इस्लामच्या सदस्यांनी माल्कम एक्सची हत्या केली.
१९६७ - जिनिव्हा येथे नि:शस्त्रीकरण शिखर परिषद याच दिवशी पार
१९७० - स्वित्झर्लंडच्या झुरिक शहराजवळ स्विस एर फ्लाईट ३३० मध्ये आकाशात बॉम्बस्फोट होउन विमान नष्ट. ३८ ठार.
१९७२ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने चीनला भेट दिली.
१९७३ - इस्रायेलच्या लढाउ विमानांनी लिब्याचे नागरी विमान पाडले. १०८ ठार.
१९७४ - इस्रायेलने सुएझ कालव्याचा ताबा सोडला.
१९९५ - अल्जीरियातील कारागृहात उठाव. ४ रक्षक व ९६ कैदी ठार.
१९९५ - स्टीव फॉसेटने गरम हवेच्या फुग्यातुन एकट्याने पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
२००७ - इटलीच्या पंतप्रधान रोमानो प्रोदीने राजीनामा दिला परंतु राष्ट्राध्यक्ष जॉर्जियो नॅपोलितानोने तो नामंजूर केला.
१६८८ - उलरिका एलिनोरा, स्वीडनची राणी.
१७२८ - झार पीटर तिसरा, सम्राज्ञी कॅथेरिनचा पती.
१८७५ - जीन काल्मेंट, हिचे मृत्युच्या वेळचे वय १२२ वर्षे व १६४ दिवस होते. हा जागतिक उच्चांक आहे.
१८९४ - शांतीस्वरुप भटनागर यांचा जन्म
१८९९ - कवी निराला त्रिपाठी यांचा जन्म
१९३७ - हॅराल्ड पाचवा, नॉर्वेचा राजा.
१९५२ - ज्या पिंग्वा, चिनी भाषेमधील कादंबरीकार.
१९७० - मायकेल स्लेटर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९८० - जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक, भूतानाचा राजा.
१४३७ - जेम्स पहिला, स्कॉटलंडचा राजा.
१५१३ - पोप ज्युलियस दुसरा.
१८२९ - राणी चेन्मम्माचा मृत्यू झाला.
१८४६ - निंको, जपानी सम्राट.
१८६२ - जस्टिनस कर्नर, जर्मन कवी.
१९०१ - जॉर्ज फ्रांसिस फित्झगेराल्ड, आयरिश गणितज्ञ.
१९१३ - सेनापती व बंगालचे क्रांतिकारक वीरेंद्रनाथ यांना याच दिवशी फ़ाशी
१९२६ - हाइका केमरलिंघ ऑन्स, डच भौतिकशास्त्रज्ञ.
Post a Comment