५ फेब्रुवारी

फेब्रुवारी ५ - दिनविशेष

विष्णु नरसिंह जोग (जन्म : पुणे,१४ सप्टेंबर १८६७, मृत्यू ५ फेब्रुवारी १९२०) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे कार्य पद्धतशीरपणे पुढे नेण्याचे प्रयत्न करणारे संतपुरुष होते. विष्णुबुवा जोग म्हणून हे सर्वपरिचित आहेत. ते आळंदीतील वारकरी शिक्षणसंस्थेचे संस्थापक, कीर्तनकार, प्रवचनकार आणि लेखक होते. विष्णुपंत जोग हे अत्यंत निरिच्छ होतेआणि लोकमान्य टिळक यांचे स्नेही व चहाते होते. ते स्वदेशी वस्तू वापरीत आणि टिळकांना यथाशक्ती मदत करीत. फेब्रुवारी ५ १९२० रोजी विष्णुबुवा जोगांचे निधन झाले. त्यावेळी केसरीत टिळकांनी लिहिलेला मृत्युलेख छापून आला होता.

जागतिक दिवस :

संविधान दिन - मेक्सिको.

मौखिक आरोग्य दिवस

ठळक घटना/घडामोडी :

१२९४ - देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त झाला.

१६६४ - शिवरायांनी आपले ठाण रायगडावर मातोश्री जिजाबाईच्या सहवासात मांडले.

१९२२ - रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध.

१९५८ - टायबी नावाचा हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.

१९९६ - मुंबई येथील चौथ्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात 'सोना माटी' या भारतीय लघुपटाने सुवर्णपदक पटकावले.

२००३ - अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.

२००४ - पुण्याच्या स्वाती घाटेने वूमन ग्रँडमास्टर किताबाचा तिसरा व शेवटचा नॉर्म संपादन केला.

२००० - रशियाच्या सैन्याने चेच्न्यातील ग्रोझ्नी शहराजवळ ६० नागरिकांना ठार मारले.

२००४ - इंग्लंडच्या मोरेकांबेच्या खाडीत अचानक मोठी भरती येउन ३५ शिंपले वेचणारे अडकले. त्यातील २३ मृत्युमुखी पडले.

२००८ - अमेरिकेच्या दक्षिण भागात टोरनॅडोंचा उत्पात. ५७ ठार.

जन्म/वाढदिवस :

१७८८ - रॉबर्ट पील, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.

१८८९ - अर्नेस्ट टिल्डेस्ली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९०० - अडलाई स्टीवन्सन, अमेरिकन राजकारणी.

१९४५ - शालट रामपलान.

१९७६ - अभिषेक बच्चन, भारतीय चित्रपट अभिनेता.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

१९२० - विष्णुबुवा जोग, वारकरी संप्रदायाचे कार्य पुढे नेणारे.

१९१७ - जबर अल-मुबारक अल-सबाह दुसरा, कुवैतचा अमीर.

२००० - वैद्य माधवशास्त्री जोशी, महाराष्ट्र आयुर्वेद महासंमेलनाचे माजी अध्यक्ष.

२००३ - गणेश गद्रे, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top