
संत तुकाराम (ऊर्फ तुकोबा, तुका, तुक्या) हे एक वारकरी संत होते. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हा तुकारामांचा आराध्यदेव होता. तुकारामांना वारकरी 'जगद्गुरु ' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल , श्री ज्ञानदेव तुकाराम , पंढरीनाथ महाराज की जय , जगदगुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात. इ.स. १६५० मध्ये एका सार्वजनिक समारंभात त्यांचा देव, विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेला असे मानले जाते. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे निधन झाले. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो.
शिक्षक दिन - लेबेनॉन
१२८५ - गो-निजो जपानी सम्राट.
१८४७ - मेक्सिकन-अमेरिकन युद्ध - अमेरिकेने मेक्सिकोच्या व्हेरा क्रुझ शहरावर चढाई केली.
१९३५ - अॅडॉल्फ हिटलरने जर्मन वायुदल लुफ्तवाफेची स्थापना केल्याचे जाहीर केले.
१९४५ - दुसरे महायुद्ध - अमेरिकेच्या बी.२९ बॉम्बफेकी विमानांनी जपानची राजधानी टोक्योवर तुफान बॉम्बहल्ले केले. १,००,०००पेक्षा अधिक मृत्युमुखी.
१९५७ - अलास्काच्या अँड्रियानोफ द्वीपसमूहाजवळ समुद्रात रिश्टर मापनपद्धतीनुसार ९.१ तीव्रतेचा भूकंप झाला त्यामुळे ५० फूटी त्सुनामी तयार झाले.
१९५९ - बार्बी या बाहुलीच्या विक्रीस सुरुवात.
१९६७ - जोसेफ स्टालिनची मुलगी स्वेतलाना अलिलुयेवाने अमेरिकेला पळ काढला.
१९७६ - इटलीच्या कॅव्हालीझ स्की रिसॉर्टवर केबलकारला अपघात. ४२ ठार.
२००६ - एन्सेलाडस या शनिच्या चंद्रावर द्रवरुपात पाणी असल्याचा शोध लागला.
१६२९ - अलेक्सिस पहिला, रशियाचा झार.
१८८७ - फिल मीड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१८९० - व्याचेस्लाव्ह मोलोटोव्ह, रशियन राजकारणी.
१८९४ - फ्रांक अर्नाऊ, जर्मन कवी, लेखक.
१९२९ - डेसमंड हॉइट, गयानाचा पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष.
१९४३ - बॉबी फिशर, अमेरिकन बुद्धिबळ खेळाडू.
१२०२ - स्वेर, नॉर्वेचा राजा.
१६५० - संत तुकाराम.
१८८८ - कैसर विल्हेम पहिला, जर्मनीचा सम्राट.
१९७१ - के. आसिफ, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथालेखक.
१९९२ - मेनाकेम बेगिन, इस्रायेलचा पंतप्रधान.
१९९४ - अभिनेत्री देविका राणी.
२००३ - बर्नार्ड डोवियोगो, नौरूचा राष्ट्राध्यक्ष.
Post a Comment