११ जानेवारी

जानेवारी ११ - दिनविशेष

लालबहादूर शास्त्री (२ ऑक्टोबर, इ.स. १९०४ - ११ जानेवारी, इ.स. १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हियेत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद (तत्कालीन सोव्हियेत संघात, वर्तमान उझबेकिस्तानात) येथे दौऱ्यावर असताना ११ जानेवारी, इ.स. १९६६ रोजी यांचा हृदयविकाराचे दोन झटके येऊन मृत्यू झाला.

जागतिक दिवस :

प्रजासत्ताक दिन - आल्बेनिया.

एकता दिन - नेपाळ.

स्वतंत्रता संघर्ष दिन - मोरोक्को.

ठळक घटना/घडामोडी :

१६९३ - सिसिलीमध्ये माउंट एटना या ज्वालामुखीचा उद्रेक.

१७८७ - विल्यम हर्शलने टायटेनिया व ओबेरोन या युरेनसच्या उपग्रहांचा शोध लावला.

१८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - अलाबामा अमेरिकेपासून विभक्त झाले.

१८६३ - अमेरिकन यादवी युद्ध-आर्कान्सा पोस्टची लढाई - उत्तरेच्या जॉन मॅकक्लेर्नान्ड व डेव्हिड पोर्टर या सेनापतींनी आर्कान्सा नदीवर उत्तरेचे वर्चस्व प्रस्थापित केले.

१८६७ - बेनितो हुआरेझ पुन्हा मेक्सिकोच्या अध्यक्षपदी.

१८७९ - दक्षिण आफ्रिकेत अँग्लो झुलु युद्ध सुरू झाले.

१९१९ - रोमेनियाने ट्रान्सिल्व्हेनिया बळकावले.

१९२२ - मधुमेहाच्या रुग्णावर प्रथमतः इन्सुलिनचा प्रयोग केला गेला.

१९४२ - दुसरे महायुद्ध - जपानने नेदरलंड विरूद्ध युद्ध पुकारले व नेदरलंड ईस्ट ईंडिझ वर हल्ला चढविला.

१९४२ - दुसरे महायुद्ध - जपानने कुआलालंपुर जिंकले.

१९४३ - दुसरे महायुद्ध - युनायटेड किंग्डम व अमेरिकेने चीनमधील हक्क सोडले.

१९४९ - लॉस ऍंजेलसमध्ये पहिल्यांदा हिमवर्षाव झाला.

१९५५ - नेपानगरमध्ये पहिला भारतीय कागद कारखाना सुरू झाला.

१९६० - चाडने स्वतःला स्वतंत्र घोषित केले.

१९६२ - पेरूमध्ये हुआस्कारन ज्वालामुखीचा उद्रेक. ४,००० ठार.

१९७२ - बांगलादेश मुक्ति युद्धात पाकिस्तानचा सपशेल पराभव. पूर्व पाकिस्तानातून बांगलादेशची निर्मिती.

१९८० - बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शोर्ट वयाच्या १४व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.

जन्म/वाढदिवस :

१३२२ - कोम्यो, जपानी सम्राट.

१३५९ - गो-एन्यु, जपानी सम्राट.

१७५५ - अलेक्झांडर हॅमिल्टन, अमेरिकेचा पहिला खजिनदार.

१८०७ - एझ्रा कॉर्नेल, अमेरिकन उद्योगपती, कॉर्नेल युनिव्हर्सिटीचा संस्थापक.

१८१५ - जॉन ए. मॅकडोनाल्ड, कॅनडाचा पहिला पंतप्रधान.

१८५८ - श्रीधर पाठक, हिंदी साहित्यिक.

१८५९ - जॉर्ज नथानियेल कर्झन, ब्रिटीश राजकारणी भारतातील इंग्लंडचा व्हाइसरॉय.

१८६२ - फ्रँक सग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१८९८ - विष्णु सखाराम खांडेकर, मराठी साहित्यिक.

१९०३ - जॅक सीडल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

१९०६ - आल्बर्ट हॉफमन, स्वित्झर्लंडचा रसायनशास्त्रज्ञ.

१९११ - झेन्को सुझुकी, जपानी पंतप्रधान.

१९२७ - जॉनी हेस, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.

१९३४ - ज्याँ क्रेटिएन, कॅनडाचा विसावा पंतप्रधान.

१९४४ - शिबु सोरेन, भारतीय राजकारणी.

१९५४ - बोनी कपूर, हिंदी चित्रपट दिग्दर्शक.

१९७१ - सजीव डिसिल्वा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

१९७३ - राहुल द्रविड, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

३१४ - पोप मिल्टिआडेस.

७०५ - पोप जॉन सहावा.

१९२१ - वासुदेवाचार्य केसर, कन्नड साहित्यिक.

१९२३ - कॉन्स्टन्टाईन पहिला, ग्रीसचा राजा.

१९६६ - लाल बहादूर शास्त्री, भारताचे पंतप्रधान.

१९८३ - घनश्यामदास बिरला, भारतीय उद्योगपती.

२००८ - यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहाससंशोधक.

२००८ - सर एडमंड हिलरी

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top