१२ जानेवारी

जानेवारी १२ - दिनविशेष

जिजाबाई (जिजामाता, राजमाता जिजाऊ) (जानेवारी १२, १५९८ - १७ जून, १६७४) ह्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील. आईचे नाव म्हाळसाबाई. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.

स्वामी विवेकानंद (जानेवारी १२, १८६३ - जुलै ४, १९०२) हे भारताचे थोर संत व नेते होते. विवेकानंद ह्यांचे खरे नाव नरेंद्रनाथ दत्त(नरेंद्र, नरेन ) असे होते. ते मूळचे बंगालचे रहिवासी होते. ते श्री रामकृष्ण परमहंस ह्यांचे शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत.

जागतिक दिवस :

राष्ट्रीय युवक दिन - भारत.

झांझिबार क्रांती दिन - टांझानिया.

ठळक घटना/घडामोडी :

१७०८ - मराठी राज्याची नवी राजधानी सातारा ही करण्यात आली.

१९३६ - डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची घोषणा.

२००६ - हज यात्रेच्या अखेरच्या दिवशी मक्केजवळ मीना येथे प्रतीकात्मक दगड फेकण्याचा विधी चालू असताना झालेल्या चेंगराचेंगरीत ३४५ मुस्लिम भाविकांचा मृत्यु व २९० जखमी

जन्म/वाढदिवस :

१५९८ - जिजाबाई (राजमाता जिजाऊ), छत्रपती शिवरायांच्या आई.

१८६३ - स्वामी विवेकानंद, भारतीय तत्त्वज्ञ.

१८९२ - मिखाइल गुरेविच, रशियन विमान तंत्रज्ञ.

१८९३ - हर्मन गोरिंग, नाझी अधिकारी.

१८९३ - आल्फ्रेड रोझेनबर्ग, नाझी अधिकारी.

१९०२ - सौद, सौदी अरेबियाचा राजा.

१९०२ - धुंडिराजशास्त्री विनोद,महर्षी न्यायरत्न.

१९०६ - महादेवशास्त्री जोशी, भारतीय संस्कृतीकोशाचे व्यासंगी संपादक.

१९१८ - सी.रामचंद्र, ज्येष्ठ संगीतकार.

१९१६ - पीटर विलेम बोथा, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष.

१९१७ - महाऋषी महेश योगी, भारतीय तत्त्वज्ञ.

१९४० - डिक मोत्झ, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.

१९४९ - हारुकी मुराकामी, जपानी साहित्यिक, अनुवादक.

१९६२ - रिची रिचर्डसन, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

१९७२ - पॉल विल्सन, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.

१९७६ - गॅव्हिन रेनी, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

१५१९ - मॅक्सिमिलीयन पहिला, पवित्र रोमन सम्राट.

१८३४ - विल्यम विंड्हॅम ग्रेनव्हिल, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.

१९४४ - वासुकाका जोशी, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी व चित्रशाळेचे विश्वस्त.

१९७६ - ऍगाथा ख्रिस्ती, प्रसिद्ध रहस्यकथा लेखिका.

१९९२ - पंडित कुमार गंधर्व, हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रातील ख्यातनाम गायक.

२००५ - अमरीश पुरी, भारतीय अभिनेता.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top