
दुर्गा खोटे (जानेवारी १४, इ.स. १९०५ - सप्टेंबर २२, इ.स. १९९१) या मराठी अभिनेत्री होत्या. इ.स. १९३२ सालच्या अयोध्येचा राजा या मराठीतील पहिल्या बोलपटात प्रमुख भूमिकांपैकी राणी तारामतीची भूमिका यांनी केली होती. भरत मिलाप (इ.स. १९४२) चित्रपटात कैकेयी, तर मुघल-ए-आझम (इ.स. १९६०) चित्रपटात जोधाबाई, इत्यादी यांनी रंगवलेल्या भूमिकादेखील विशेष गाजल्या. सुमारे पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत यांनी मराठी व हिंदी भाषांतील अनेक चित्रपट व नाटकांतून भूमिका केल्या. इ.स. १९६८ साली पद्मश्री पुरस्कार, तर इ.स. १९८३ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन यांना गौरवण्यात आले.
मकरसंक्रांत, उत्तरायण - भारत
१७६१ - पानिपतची तिसरी लढाई - मराठे व अहमदशाह अब्दाली मध्ये झालेले भीषण युद्ध.
१९९३ - मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले.
१९९८ - ज्येष्ठ गायिका एम.एस. सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान जाहिर.
२००० - ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी विचारवंत बाबा उर्फ मुरलीधर देविदास आमटे यांना इ.स. १९९९चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्र्पतींच्या हस्ते प्रदान.
२००४ - जॉर्जियाच्या पाच क्रॉस ध्वजला पाचशे वर्षांनंतर पुन्हा अधिकृत ध्वजाचे स्थान देण्यात आले.
२००५ - शनिच्या उपग्रह टायटनवर हायगेन्स प्रोब हे अंतराळयान उतरले.
१८८२ - रघुनाथ धोंडो कर्वे, संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण या विषयी काम करणारे कृतिशील विचारवंत.
१८९२ - दिनकर बळवंत देवधर , क्रिकेटमहर्षी
१८९६ - डॉ. चिंतामणराव देशमुख. , भारताचे अर्थमंत्री
१९०५ - दुर्गा खोटे, मराठी अभिनेत्री.
१९०८ - द्वा.भ. कर्णिक , ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत.
१९२६ - महाश्वेतादेवी , ज्ञानपीठ व इंदिरा गांधी एकात्मता पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका.
१७४२ - एडमंड हॅले, ब्रिटिश अंतरिक्षशास्त्रज्ञ.
१७४२ - लुईस कॅरोल, इंग्लिश लेखक व गणितज्ञ.
१८६७ - ज्याँ ओगूस्ट डोमिनिक अँग्र, नव-अभिजात चित्रपरंपरेतील फ्रेंच चित्रकार.
१९०५ - अर्न्स्ट ऍबी, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
१९०७ - सर जेम्स फर्गसन, ब्रिटिश राजकारणी, मुंबई, दक्षिण ऑस्ट्रेलिया व न्यू झीलँडचा गव्हर्नर.
१९२० - जॉन फ्रांसिस डॉज, अमेरिकन कार उद्योगपती.
१९३७ - जयशंकर प्रसाद, हिंदी साहित्यिक.
१९५७ - हंफ्री बोगार्ट, अमेरिकन अभिनेता.
१९७२ - फ्रेडरिक नववा, डेन्मार्कचा राजा.
१९७६ - तुन अब्दुल रझाक, मलेशियाचा दुसरा पंतप्रधान.
१९७७ - अँथोनी इडन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
१९८४ - रे क्रॉक, अमेरिकन झटपट-खाद्यपदार्थ उद्योगपती.
२००१ - बुर्कहार्ड हाइम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
Post a Comment