१५ जानेवारी

जानेवारी १५ - दिनविशेष

खाशाबा जाधव (जानेवारी १५, इ.स. १९२६ - ऑगस्ट १४, इ.स. १९८४) हे ऑलिंपिकपदकविजेते मराठी, भारतीय कुस्तीगीर होते. इ.स. १९५२ सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते. जाधवांनी इ.स. १९४८ सालातील लंडन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजनगटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला. इ.स. १९५२ सालातील हेलसिंकी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ५२ किलोग्रॅम वजनगटात फ्रीस्टाइल प्रकारांतर्गत कांस्यपदक जिंकले.

जागतिक दिवस :

लष्कर दिन

जॉन चिलेम्ब्वे दिन - मलावी.

कोरियन लिपी दिन - उत्तर कोरिया.

ठळक घटना/घडामोडी :

१९१९ - राजर्षी शाहू महाराजांनी आदेश काढून स्पृश्य-अस्पृश्य विद्यार्थ्यांना एकाच शाळेत शिक्षण देण्याची व्यवस्था केली.

१९४९ - भारताच्या स्वातंत्र्यानंतर फिल्डमार्शल के.एम. करिअप्पा यांनी पहिले लष्करप्रमुख म्हणून सूत्रे स्विकारली. हा दिवस लष्करदिन म्हणून ओळखला जातो.

१९७५ - अँगोलाला पोर्तुगाल पासून स्वातंत्र्य.

१९९६ - भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा, संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले.

१९९९ - ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.

जन्म/वाढदिवस :

१८५६ - विल्यम स्कॉटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१८६३ - विल्हेम मार्क्स, जर्मनीचा चान्सेलर.

१८९७ - शू चीमो, चिनी भाषेमधील कवी.

१९०८ - एडवर्ड टेलर, पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ, हायड्रॉजन बॉम्बचा संशोधक.

१९०९ - ज्याँ बुगाटी, जर्मन अभियंता.

१९२६ - खाशाबा जाधव, भारतीय कुस्तीगीर.

१९२९ - डॉ.मार्टिन लुथर किंग, अमेरिकन नागरी अधिकार चळवळीचा नेता.

१९१८ - गमाल अब्देल नासर, इजिप्तचा राष्ट्राध्यक्ष.

१९५६ - मायावती, भारतीय राजकारणी.

१९५६ - पॉल पार्कर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९५८ - बोरिस ताडिक, सर्बियाचा राष्ट्राध्यक्ष.

१९६७ - रिचर्ड ब्लेकी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९७५ - ग्रेग लव्हरिज, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

१५९५ - मुराद तिसरा, ऑट्टोमन सम्राट.

१९७१ - दीनानाथ दलाल महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार यांचे मुंबईत निधन.

१९९८ - गुलझारीलाल नंदा, भारतीय पंतप्रधान, स्वातंत्र्यसैनिक व गांधीवादी कार्यकर्ते.

२००२ - विठाबाई भाऊ नारायणगावकर, राष्ट्रपतीपदक विजेत्या तमाशा कलावंत.

२००६ - जबर अल-अहमद अल-जबर अल-साबा, कुवैतचा अमीर.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top