
बाबुराव पेंटर यांचा जन्म जून, १८९० मध्ये कोल्हापूर येथे झाला. त्यांचे मूळ नाव बाबुराव मेस्त्री असे होते. चित्रकला व शिल्पकला यांचे धडे त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. सुरुवातीला ते तैलचित्रे काढत. गंधर्व नाटक कंपनीच्या रंगवलेल्या पडद्यांमुळे बाबूराव पेंटर यांची कलाक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली.
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे (जानेवारी १८, इ.स. १८४२ - जानेवारी १६, इ.स. १९०१) ऊर्फ माधवराव रानडे हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व ब्रिटिश भारतामधील न्यायाधीश होते. इ.स १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्षही होते.
मार्टिन लुथर किंग दिन - अमेरिका.
शिक्षक दिन - थायलंड.
१६८१ - संभाजी राजेंचा छत्रपती म्हणून राज्यभिषेक झाला.
१९०९ - अर्नेस्ट शॅकल्टनच्या संघाने चुंबकीय दक्षिण ध्रुव शोधला.
१९१७ - पहिले महायुद्ध - जर्मन परराष्ट्रसचिव आर्थर झिमरमनने मेक्सिकोला अमेरिकेविरूद्ध युद्ध पुकारण्यासाठी तार पाठवली.
१९१९ - अमेरिकेचे संविधान सुधारून संपूर्ण राष्ट्रात दारूबंदी जाहीर करण्यात आली.
१९४१ - नेताजी सुभाषचंद्राचे देशाबाहेर प्रयाण झाले.
१९५५ - नॅशनल डिफेन्स अकॅडमी इमारतीचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उदघाट्न.
१९७९ - ईराणच्या शहा मोहम्मद रझा पेहलवीने कुटुंबासहित इजिप्तला पळ काढला.
१९९२ - एल साल्व्हाडोर सरकार व क्रांतिकारकांनी मेक्सिको सिटीत चापुल्तेपेकचा तह मान्य केला व १२ वर्षे चाललेले गृहयुद्ध संपवले.
१९९५ - आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण.
१९९६ - भारतीय कापड गिरणी कामगार नेता दत्ता सामंतची हत्या.
१९९८ - ज्येष्ठ उर्दू कवी व लेखक अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
२००१ - कॉँगोचा अध्यक्ष लॉरें-डेझरे कबिलाची त्याच्याच अंगरक्षकाकडून हत्या.
२००२ - संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने एकमताने ओसामा बिन लादेन व ईतर तालिबान विरूद्ध ठराव संमत केला.
२००३ - स्पेस शटल कोलंबिया अंतराळात. १६ दिवसानंतर परतताना अपघातात सर्व अंतराळवीरांचा मृत्यू.
२००५ - ६६ वर्षांच्या एड्रियाना ईलेस्कुने मुलीला जन्म दिला व आत्तापर्यंतची सर्वात जास्त वयाची माता ठरली.
२००६ - एलेन जॉन्सन-सर्लिफ लायबेरियाच्या अध्यक्षपदी. सर्वात प्रथम आफ्रिकन महिला राष्ट्राध्यक्ष.
२००८ - टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या 'पीपल्स कार'चे अनावरण
१८५३ - आंद्रे मिशेलिन, फ्रेंच उद्योगपती.
१८५५ - अलेक्झांडर वेब, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१८७६ - क्लॉड बकेनहॅम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९११ - इव्हान बॅरो, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
१९१९ - सैयद अब्दुल मलिक, असमिया साहित्यिक.
१९२० - वै वै, चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार.
१९२६ - ओ.पी.नय्यर, भारतीय संगीतकार.
१९३१ - योहान्स रौ, जर्मन राष्ट्राध्यक्ष.
१९४६ - कबीर बेदी, भारतीय अभिनेता.
१९५२ - फुआद दुसरा, इजिप्तचा राजा.
१९५६ - वेन डॅनियल्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
१९७१ - हामिश अँथोनी, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
१९०१ - महादेव गोविंद रानडे, भारतीय समाजसुधारक, धर्मसुधारक, न्यायाधीश, अर्थशास्त्रज्ञ.
१९१९ - फ्रान्सिस्को दि पॉला रॉद्रिगेझ अल्वेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
१९३८ - शरत् चंद्र चतर्जी, बांगला साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक.
१९५४ - बाबूराव पेंटर, भारतीय चित्रपटनिर्माता, चित्रकार, शिल्पकार.
१९५७ - आर्तुरो तोस्कानिनि, इटालियन संगीतकार.
१९८८ - लक्ष्मीकांत झा, भारतीय अर्थशास्त्रज्ञ.
२००१ - पंडितराव बोरस्ते, भारतीय क्रीडा संघटक, शिवछत्रपती पुरस्कार विजेता.
२००३ - रामविलास जगन्नाथ राठी, भारतीय उद्योगपती.
२००५ - श्रीकृष्ण हरी मेहेंदळे, मराठी संगीतकार. पेटीवाले मेहेंदळे म्हणून ख्याती.
Post a Comment