
बेंजामिन फ्रँकलिन (जानेवारी १७, १७०६ - एप्रिल १७, १७९०) हे एक अमेरिकन वैज्ञानिक, संशोधक, पत्रकार, लेखक, राजकारणी - असे बहुआयामी व्यक्ती होते.
द.रा. कापरेकर (जन्म : डहाणू-ठाणे जिल्हा, महाराष्ट्र, १७ जानेवारी १९०५; मृत्यू : १९८६) हे देवळाली(नाशिक)मध्ये राहणारे एक जागतिक कीर्तीचे गणितज्ञ होते. त्यांच्या महाविद्यालयीन काळात त्यांना गणितातले रँग्लर परांजपे पारितोषिक मिळाले होते. ते नाशिकजवळच्या देवळाली येथे शिक्षक होते आणि १९६२मध्ये निवृत्त झाले. त्यांची राहणी अत्यंत साधी होती. धोतर, कोट, टोपी हा त्यांचा नित्याचा वेश होता. नोकरीच्या काळात आणि निवृत्तीनंतरही कापरेकरांचा गणितातील आकड्यांशी खेळ चालूच होता. नोकरीच्या काळात त्यांची यासाठी हेटाळणी होत असे.
-
१७७३ - कॅप्टन जेम्स कूकने अंटार्क्टिक वृत्त पार केले.
१७८१ - अमेरिकन क्रांती - जनरल डॅनियल मॉर्गनच्या अमेरिकन सैन्याने लेफ्टनंट कर्नल बानास्ट्रे टार्ल्टनच्या ब्रिटीश सैन्याला हरवले.
१८१९ - सिमोन बॉलिव्हारने कोलंबियाच्या प्रजासत्ताकत्त्वाचा जाहीरनामा प्रकाशित केला.
१८५२ - युनायटेड किंग्डमने दक्षिण आफ्रिकेतील बोअर वसाहतींचे स्वातंत्र्य मान्य केले.
१८९३ - लॉरिन ए. थर्स्टनच्या नेतृत्त्वाखाली सार्वजनिक सुरक्षेसाठीच्या नागरिक समितीने हवाईच्या राणी लिलिउओकालानीचे राज्य उलथवले.
१८९९ - अमेरिकेने पॅसिफिक महासागरातील वेक आयलंडचा ताबा घेतला.
१९१२ - अमुंडसेननंतर एक महिन्याने रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोचला.
१९१७ - अमेरिकेने डेन्मार्ककडून व्हर्जिन आयलंड २,५०,००,००० डॉलरला विकत घेतले.
१९४५ - रशियन सैन्याने पोलंडची राजधानी वॉर्सो काबीज केले. युद्धात शहर संपूर्ण उद्ध्वस्त झालेले होते.
१९४५ - रशियन सैन्य जवळ येताना पाहून नाझींनी ऑश्विझ काँन्सेन्ट्रेशन कॅम्प रिकामा करायला सुरूवात केली.
१९४६ - संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने आपले पहिले अधिवेशन सुरू केले.
१९५० - बॉस्टनमध्ये ११ लुटारूंनी २०,००,००,००० डॉलर पळवले. अंतर्गत वादात त्यापैकी तिघांचा खून झाला व आठ जणांना शिक्षा झाली. लुटीचे पैसे आजतगायत मिळालेले नाहीत. हे पैसे ग्रांड रॅपिड्स, मिनेसोटाजवळ लपवून ठेवले असल्याची वदंता आहे.
१९५६ - बेळगाव - कारवार आणि बिदर जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा.
१९६६ - स्पेनमध्ये पालोमारेस गावाजवळ अमेरिकेच्या बी.५२ बॉम्बर व के.सी.१३५ जातीच्या विमानात टक्कर. बी.५२ मधून तीन ७० कि.टन क्षमतेचे हायड्रोजन बॉम्ब जमिनीवर पडले व एक समुद्रात.
१९७३ - फिलिपाईन्सने फर्डिनांड मार्कोसला आजन्म अध्यक्ष घोषित केले.
१९९१ - आखाती युद्ध - ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म पहाटे सुरू. इराकने इस्रायेल वर ८ स्कड क्षेपणास्त्रे सोडली. इस्रायेलकडून प्रत्युत्तर नाही.
१९९१ - ओलाफ पाचव्याच्या मृत्यूनंतर हॅराल्ड पाचवा नॉर्वेच्या राजेपदी.
१९९४ - नॉर्थरिज, कॅलिफोर्नियात ६.९ मापनाचा भूकंप.
१९९५ - जपानमधील कोबेत ७.३ मापनाचा भूकंप. ६,४३३ ठार. अपरिमित वित्तहानी.
२००२ - कॉँगोमधील माउंट न्यिरागोन्गो या ज्वालामुखीचा उद्रेक. ४,००,००० बेघर.
२००१ - मध्य प्रदेश सरकारचा शास्त्रीय नृत्यासाठीचा कालिदास सन्मान रोहिणी भाटे यांना जाहीर. अपारंपारिक उर्जा क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा सूर्या पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एम.जी.ताकवले यांना जाहीर.
१७०६ - बेंजामिन फ्रँकलिन, अमेरिकन लेखक, संशोधक, प्रकाशक व राजदूत.
१८९५ - विठ्ठल दत्तात्रय घाटे, मराठी लेखक, शिक्षणतज्ञ.
१८९९ - अल कपोन, अमेरिकन माफिया.
१९०५ - दत्तात्रय रामचंद्र कापरेकर, भारतीय गणितज्ञ.
१९०६ - शकुंतला परांजपे, भारतीय समाजसेविका.
१९०८ - ब्रायन व्हॅलेन्टाइन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९१३ - यादवेंद्रसिंघ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९२५ - अब्दुल कारदार, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
१९२६ - क्लाइड वॉलकॉट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
१९२८ - केन आर्चर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९३१ - जेम्स अर्ल जोन्स, अमेरिकन अभिनेता.
१९३९ - अंताव डिसूझा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
१९४२ - मुहम्मद अली, अमेरिकन मुष्टीयोद्धा.
१९७७ - मॅथ्यू वॉकर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
१८२६ - हुआन क्रिसोस्तोमो अर्रियेगा, स्पॅनिश संगीतकार
.१८९३ - रदरफोर्ड बी. हेस, अमेरिकेचा १९वा राष्ट्राध्यक्ष.
१९६१ - पॅट्रिस लुमुम्बा, काँगोचा पंतप्रधान.
२००० - सुरेश हळदणकर, जुन्या पिढीतील गायक आणि अभिनेते.
२००५ - झाओ झियांग, चीनचा राष्ट्राध्यक्ष.
Post a Comment