१८ जानेवारी

जानेवारी १८ - दिनविशेष

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे (जानेवारी १८, इ.स. १८४२ - जानेवारी १६, इ.स. १९०१) ऊर्फ माधवराव रानडे हे मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक, अर्थशास्त्रज्ञ व ब्रिटिश भारतामधील न्यायाधीश होते. इ.स १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे अध्यक्षही होते.

वि.द. घाटे म्हणजेच, विठ्ठल दत्तात्रेय घाटे (१८९४ - १९७८) हे मराठी कवी, लेखक होते. स्वत: वि.द.घाटे यांनी इतिहासलेखन, काव्य, नाट्यलेखन, कवितालेखन, आत्मचरित्र आदी अनेक ललितलेखन प्रकार वापरले. आचार्य अत्रे यांच्या बरोबर त्यांनी ’नवयुग वाचनमाला’ संपादित केली. महाराष्ट्रात शालेय पाठ्यपुस्तक म्हणून नावाजलेली गेलेली अशी उत्तम वाचनमाला त्यापूर्वीही झाली नव्हती, आणि त्यानंतरही झाली नाही.

जागतिक दिवस :

-

ठळक घटना/घडामोडी :

१९११ - युजीन बी. इलायने सान फ्रान्सिस्कोच्या बंदरात उभ्या असलेल्या यु.एस.एस.पेनसिल्व्हेनिया या जहाजावर विमान उतरवले. जहाजावर विमान उतरण्याचा हा पहिलाच प्रसंग.

१९१२ - इंग्लिश शोधक रॉबर्ट एफ. स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोचला. त्याच्या दुर्दैवाने रोआल्ड अमुंडसेन त्याआधी महिनाभर तेथे पोचला होता. स्कॉट व त्याचे सहकारी परतताना मृत्यू पावले.

१९१९ - पहिले महायुद्ध - व्हर्साय येथे पहिली शांति परिषद सुरू झाली.

१९४३ - दुसरे महायुद्ध - जर्मन सैन्याने लेनिनग्राडला घातलेला वेढा रशियाने फोडला.

१९५६ - संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी मुंबईत ११४ वेळा गोळीबार. १० ठार, २५० जखमी, औद्योगिक विभागात दंगल वाढल्याने २४ तास कर्फ्यू. मुंबईच्या पाच काँग्रेस आमदारांचा राजीनामा.

१९६४ - न्यूयॉर्कमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतींचे भूमिपूजन.

१९६९ - युनायटेड एरलाइन्स फ्लाइट २६६ हे बोईंग ७२७ जातीचे विमान सांता मॉनिका बेमध्ये कोसळले. ३८ ठार.

१९७७ - सिडनीजवळ ग्रॅनव्हिल स्थानकात रेल्वे घसरली. ८३ ठार.

१९९७ - नॉर्वेच्या बोर्ग औसलँडने एकट्याने व कोणाच्याही मदतीशिवाय अटलांटिक महासागर पार केला.

जन्म/वाढदिवस :

१८४२ - न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, अर्थशास्त्रज्ञ,समाजसुधारक,राजनीतीज्ञ.

१८४९ - एडमंड बार्टन, ऑस्ट्रेलियाचा पहिला पंतप्रधान.

१८५४ - थॉमस वॅट्सन, अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलचा मदतनीस, पहिल्या दूरध्वनी संभाषणातील भागीदार.

१८९२ - ऑलिव्हर हार्डी, अमेरिकन अभिनेता. लॉरेल आणि हार्डी या जोडीतील अर्धा भाग.

१८९४ - लेस्ली वॉलकॉट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

१८८८ - थॉमस सॉपविथ, ब्रिटीश विमान उद्योजक.

१८८९ - नाट्यछटाकार दिवाकर लेखक.

१८९५ - विठठ्ल दत्तात्रय घाटे प्रसिद्ध लेखक

१९०४ - कॅरी ग्रँट, इंग्लिश अभिनेता.

१९१६ - अलेक कॉक्सॉन, ईंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९३१ - चुन दू-ह्वान, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.

१९३३ - रे डॉल्बी, अमेरिकन संशोधक.

१९४४ - पॉल कीटिंग, ऑस्ट्रेलियाचा २४वा पंतप्रधान.

१९७२ - विनोद कांबळी, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

१८६२ - जॉन टायलर, अमेरिकेचा १०वा अध्यक्ष.

१९२७ - कार्लोटा, मेक्सिकोची सम्राज्ञी.

१९३६ - रूड्यार्ड किप्लिंग, ब्रिटीश लेखक. रावबहाद्दुर काळे, अर्थशास्त्रज्ञ व नेमस्त पुढारी.

१९४७ - कुंदनलाल सैगल, भारतीय अभिनेता, गायक.

१९६७ - डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे, कृषितज्ज्ञ व क्रांतिकारक.

१९७१ - बॅरिस्टर नाथ पै, भारतीय वकील, संसदसदस्य.

१९८६ - प्राचार्य नारायण गोपाळ तवकर, शिक्षणतज्ज्ञ, इतिहासकार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक

२००३ - हरिवंशराय बच्चन, हिंदी साहित्यिक.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top