
शाहजहान, जन्मनाव खुर्रम, ( जानेवारी ५, इ.स. १५९२; लाहोर, पंजाब (पाकिस्तान) - जानेवारी २२, इ.स. १६६६; आग्रा;) हा मुघल सम्राट व औरंगजेबाचा पिता होता. मारवाडाचा राजा उदयसिंह याची कन्या मानमती उर्फ जगत गोसई ही शहाजहानाची आई होती व तिचा विवाह जहांगिराशी इ.स.१५८६ साली झाला. तूळ रास राशिमंडळात असताना शहाजहानचा जन्म झाला.
व्हिक्टोरिया (अलेक्झांड्रिना व्हिक्टोरिया; २४ मे १८१९ - २२ जानेवारी १९०१) ही युनायटेड किंग्डमची राज्यकर्ती व ब्रिटिश भारताची पहिली सम्राज्ञी होती. ६३ वर्षे व ७ महिने सत्तेवर असलेली व्हिक्टोरिया ही आजवर युनायटेड किंग्डमची सर्वांत प्रदीर्घ काळ राज्य करणारी राज्यकर्ती आहे. तिचा कार्यकाळ व्हिक्टोरियन पर्व ह्या नावाने ओळखला जातो जो युनायटेड किंग्डममध्ये राजकीय, औद्योगिक, सांस्कृतिक व लष्करी प्रगतीचा काळ मानला जातो.
-
२००२ -हो मोरालेस बोलिव्हियाच्या राष्ट्राध्यक्षपदी. मोरालेस बोलिव्हियाचा सर्वप्रथम स्थानिक-वंशीय राष्ट्राध्यक्ष आहे.
२००२ - अमेरिकेतील केमार्ट या मोठ्या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.
२००७ - बगदादमध्ये दोन कारबॉम्बच्या स्फोटात ८८ ठार.
१७८८ - जॉर्ज गॉर्डन तथा लॉर्ड बायरन, इंग्लिश कवी.
१८९२ - मार्सेन दसॉल्त, फ्रेंच उद्योगपती.
१९०९ - उ थांट, संयुक्त राष्ट्रांचा सरचिटणीस.
१९११ - ब्रुनो क्राइस्की, ऑस्ट्रियाचा चान्सेलर.
१९१५ - टॉम बर्ट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
१९२१ - अँड्रु गंतॉम, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
१९६६ - निशांत रणतुंगा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
१६६६ - शाह जहान, मोगल सम्राट.
१९०१ - व्हिक्टोरिया, इंग्लंडची राणी.
१९२२ - पोप बेनेडिक्ट पंधरावा.
१९७३ - लिंडन बी. जॉन्सन, अमेरिकेचा ३६वा राष्ट्राध्यक्ष.
१९७८ - हर्बर्ट सटक्लिफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९९९ - ग्रॅहाम स्टेन्स, भारतातील ख्रिश्चन धर्मप्रसारक.
Post a Comment