
सुभाषचंद्र बोस (बंगाली: সুভাষ চন্দ্র বসু सुभाष चॉन्द्रो बॉसु) (जानेवारी २३, इ.स. १८९७ - ऑगस्ट १८, इ.स. १९४५?) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रेसर नेते होते. हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. त्यांनी दिलेला जय हिन्द चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.
बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे (जानेवारी २३, इ.स. १९२६; पुणे - नोव्हेंबर १७, इ.स. २०१२;मुंबई) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी, व्यंगचित्रकार, संपादक होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादक होते. २३ जानेवारी, इ.स. १९२७ मध्ये प्रबोधनाची परंपरा असणाऱ्या घरात, पुणे येथे बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला.
-
१८५५ - मिनेसोटात मिनीआपोलिसमध्ये मिसिसिपी नदीवर पहिला पूल बांधला गेला.
१८७० - मोन्टानात अमेरिकन घोडदलाने १७३ बायका व मुलांची कत्तल केली.
१८९७ - नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म भारताच्या ओडिशा राज्यातील कटक शहरात झाला.
१९२० - नेदरलँड्सने जर्मनीचा कैसर विल्हेम दुसरा याला दोस्त राष्ट्रांच्या हाती देण्यास नकार दिला.
१९४३ - दुसरे महायुद्ध - ब्रिटीश सैन्याने लिब्याची राजधानी ट्रिपोली जिंकले.
१९४३ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने पापुआतील जपानी सैन्याचा पराभव केला. येथुन जपानी आक्रमक सैन्याची पिछेहाट सुरू झाली.
१९५० - ईस्रायेलच्या संसदेने राजधानी जेरुसलेमला हलवण्याचा ठराव मंजूर केला.
१९६८ - उत्तर कोरियाने अमेरिकेची युद्धनौका यु.एस.एस. पेब्लो पकडली.
१९७३ - अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सनने व्हियेतनाममध्ये शांतितह मंजूर झाल्याची घोषणा केली.
१९९६ - संगणक भाषा जावाचे सर्वप्रथम प्रकाशन.
१९९९ - ऑस्ट्रेलियाचा धर्मप्रसारक ग्रॅहाम स्टेन्स व दोन मुलांना हिंदु अतिरेक्यांनी ओरिसात जाळून मारले.
२००२ - पाकिस्तानच्या कराची शहरात वॉल स्ट्रीट जर्नलचा पत्रकार डॅनियन पर्लचे अपहरण.
२००५ - व्हिक्टर युश्चेन्को युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षपदी.
१८९७ - नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय क्रांतिकारी.
१९२६ - बाळासाहेब ठाकरे, मराठी राजकारणी, शिवसेना पक्षाचे संस्थापक.
१९२९ - इयान थॉमसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९४२ - लॉरी मेन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९४६ - आसिफ मसूद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
१९४७ - मेगावती सुकर्णोपुत्री, इंडोनेशियाची राष्ट्राध्यक्ष.
१९५२ - ओमर हेन्री, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९५३ - मार्टिन केंट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९५४ - ट्रेव्हर हॉन्स, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९६० - ग्रेग रिची, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९७१ - ऍडम पारोरे, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
१००२ - ऑट्टो तिसरा, पवित्र रोमन सम्राट.
११९९ - याकुब, खलिफा.
१५६७ - ज्याजिंग, चिनी सम्राट.
१६६४ - शहाजीराजे भोसले.
१९१९ - राम गणेश गडकरी.
Post a Comment