२४ जानेवारी

जानेवारी २४ - दिनविशेष

होमी भाभा (इ.स. १९०९ - इ.स. १९६६) भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ होते. भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकासकार्यक्रमाचे प्रणेता मानले जाते. संयुक्त राष्ट्रच्या सभेला जातांना २४ जानेवारी, इ.स. १९६६ या दिवशी फ्रान्सच्या हद्दीत असतांना त्यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या मृत्यु नंतर ट्रॉम्बे येथील अणु संशोधन केंद्राचे नाव बदलून भाभा अणु संशोधन केंद्र असे ठेवण्यात आले.

पंडित भीमसेन जोशी (फेब्रुवारी ४, इ.स. १९२२; गदग, कर्नाटक - जानेवारी २४ इ.स. २०११; पुणे, महाराष्ट्र) हे भारतरत्‍न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते. अशा या महान गायकाचे सोमवार दिनांक जानेवारी २४,इ.स. २०११ रोजी सकाळी ८:०५ वाजता पुणे येथे वयाच्या ८८व्या वर्षी देहावसान झाले.

जागतिक दिवस :

शारीरिक शिक्षक दिन २४ ते २६ जानेवारी

ठळक घटना/घडामोडी :

१८४८ -कॅलिफोर्नियात जेम्स डब्ल्यु. मार्शलला सटर्स मिल येथे ओढ्यात सोने सापडले. यानंतर जगभरातून अभूतपूर्व गर्दी सोने मिळवायला कॅलिफोर्नियात लोटली.

१९०८ -रॉबर्ट बाडेन-पॉवेलने बॉय स्काउट्स सुरू केले.

१९२४ -रेंट पीटर्सबर्गचे नाव बदलून लेनिनग्राड करण्यात आले.

१९३६ -रआल्बेर सराउ फ्रांसच्या पंतप्रधानपदी.

१९४३ -रदुसरे महायुद्ध - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्ट व इंग्लिश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी कॅसा ब्लांका येथील परिषद आटोपली.

१९४५ -रदुसरे महायुद्ध - रशियन सैन्याने ऑश्विझ कॉन्सेन्ट्रेशन कॅम्प मुक्त केला.

१९६६ -रएर इंडियाचे बोईंग ७०७ जातीचे विमान युरोपमधील मोंट ब्लांक या सर्वोच्च शिखरावर कोसळले. ११७ ठार. मृतांत होमी भाभा.

१९७२ -रगुआममध्ये १९४४पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोइ सापडला. याकोइला दुसरे महायुद्ध संपलेले माहिती नव्हते.

१९८६ - अंतराळयान व्होयेजर २ युरेनसपासून ८१,५०० कि.मी. अंतरावर पोचले.

१९८७ - लेबेनॉनमध्ये अतिरेक्यांनी अलान स्टीन, जेसी टर्नर, रॉबर्ट पॉलहिल व मिथिलेश्वर सिंग यांचे अपहरण केले.

१९५० - ‘जन गण मन’ या गीताला राष्ट्रगीत म्हणून मान्यता.

१९९६ - मुंबई मिस इंडिया सौंदर्य स्पर्धेला प्रारंभ.

जन्म/वाढदिवस :

१८९१ - अलेक केनेडी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९०२ -रई.ए. स्पायसर, अमेरिकन बायबलतज्ञ.

१९०७ - डेनिस स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९१२ - केनेथ वीक्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

१९१५ - जॉन ट्रिम, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

१९१६ - व्हिक्टर स्टॉलमायर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

१९६८ - मार्क बर्मेस्टर, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.

१९७० - नील जॉन्सन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

१७२६ - काचेच्या पोकळनळ्या निर्माते हेन्री गॅसलर यांचे निधन.

१९६५ - विन्स्टन चर्चिल युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.

१९६६ - होमी भाभा, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.

१९९३ -थर्गुड मार्शल, अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश.

२०११ - पंडित भीमसेन जोशी, हिंदुस्तानी शास्त्रीय गायक.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top