२६ जानेवारी

जानेवारी २६ - दिनविशेष

भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी जानेवारी २६ रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताची राज्यघटना घटना समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.

जागतिक दिवस :

भारतीय प्रजासत्ताक दिन - भारत.

ऑस्ट्रेलिया दिन - ऑस्ट्रेलिया.

मुक्ति दिन - युगांडा.

ठळक घटना/घडामोडी :

१९०५ - दक्षिण आफ्रिकेत प्रिटोरिया जवळच्या खाणीत कलिनन हिरा सापडला.

१९११ - ग्लेन एच. कर्टिसने पहिले समुद्री विमान उडवले.

१९३० - भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ने २६ जानेवारी हा पूर्ण स्वराज्य दिन असल्याचे जाहीर केले. वसाहतीच्या स्वराज्याऐवजी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून काँग्रेसने २६ जानेवारी हा स्वातंत्र्यदिन मानण्याला सुरुवात केली.

१९३३ - स्वातंत्र्यदिन साजरा केल्याने देशात धरपकड.

१९३९ - स्पॅनिश गृहयुद्ध - इटलीच्या मदतीने फ्रांसिस्को फ्रँकोने बार्सेलोना जिंकले.

१९४२ - दुसरे महायुद्ध - आयर्लंडमध्ये अमेरिकन सैन्य उतरले.

१९४६ - फेलिक्स गोआं फ्रांसच्या पंतप्रधानपदी.

१९४९ - भारताच्या राज्यघटनेचा पहिला मसुदा मंजूर झाला.

१९५० - भारत प्रजासत्ताक देश झाला. डॉ. राजेन्द्रप्रसाद राष्ट्रपतिपदी.

१९५६ - इटलीत कोर्टिना द'आम्पेझो येथे सातवे हिवाळी ऑलिम्पिक खेळ सुरू.

१९६५ - भारताने हिंदी भाषाला शासकीय भाषा जाहीर केले.

१९९३ - वाक्लाव हावेल चेक प्रजासत्ताकच्या अध्यक्षपदी.

२००१ - गुजरातमध्ये भूकंप. २०,००० ठार.

२००१ - व्हेनेझुएलात सिउदाद बॉलिव्हार जवळ डी.सी.३ जातीचे विमान कोसळले. २४ ठार.

२००५ - ग्लेन्डेल, कॅलिफोर्नियात तीन रेल्वे गाड्या एकमेकांवर आदळल्या. ११ ठार, २०० जखमी.

२००५ - इराकच्या पूर्व भागात अमेरिकेचे हेलिकॉप्टर कोसळले. ३१ सैनिक ठार.

जन्म/वाढदिवस :

१९१५ - राणी गायडिनलू, ईशान्य भारतातील वीरांगना. 'राणी' ही पदवी त्यांना नेहरूंनी दिली. त्यांच्या स्मरणार्थ स्त्री शक्ती पुरस्कार दिला जातो.

१९१८ - निकोलाइ चाउसेस्क्यु, रोमेनियाचे राष्ट्राध्यक्ष.

१९१९ - खानमोहम्मद इब्राहीम, भारतीय क्रिकेट खेळाडू.

१९२७ - होजे अझ्कोना देल होयो, होन्डुरासचा राष्ट्राध्यक्ष.

१९४५ - किम ह्युस, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

१९५३ - अँडर्स फो रासमुसेन, डेन्मार्कचा पंतप्रधान.

१९५७ - शिवलाल यादव, भारतीय क्रिकेट खेळाडू.

१९५७ - अशोक मल्होत्रा, भारतीय क्रिकेट खेळाडू.

१९६२ - टिम मे, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

१९६२ - रोशन गुणरत्ने, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

१९६३ - सायमन ओ'डोनेल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

१९६८ - क्रिस प्रिंगल, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.

१९७४ - समन जयंता, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

१६३० - हेन्री ब्रिग्ज, लघुगणकसारिणी (लॉगॅरिदम टेबल्स) तयार करण्यात मोठा वाटा असणारा इंग्लिश गणितज्ञ.

१८८५ - एडवर्ड डेव्ही, ब्रिटीश संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ.

२००० - डॉन बज, सर्वप्रथम ग्रँड स्लॅम जिंकणारा अमेरिकन टेनिस खेळाडू.

२०१५ - आर.के. लक्ष्मण, भारतीय व्यंगचित्रकार.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top