
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळे (स्थापना : २७ जानेवारी १९६७) : ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागा अंतर्गत स्थापन केलेली आहे. महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमासंबंधी संशोधन करणे, त्यानुसार शालेय अभ्यासक्रम तयार करणे, या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके तयार करणे आणि विद्यार्थ्यांना कमीत कमी व योग्य दरात तसेच वेळेवर पुस्तके उपलब्ध व्हावीत अशा पद्धतीने मुद्रण आणि वितरणाची व्यवस्था करणे ही कार्ये ही संस्था करते. संस्थेचे मुख्य कार्यालय पुण्यात आहे. तसेच औरंगाबाद आणि नागपूर येथे संस्थेची विभागीय कार्यालये आहेत. ‘बालभारती’ या नावानेही ती ओळखली जाते.
ज्यू स्मृति दिन - भारत.
१८२५ - अमेरिकन काँग्रेसने आत्ताच्या ओक्लाहोमा राज्याच्या प्रदेशात ईंडियन प्रभाग तयार केला. यानंतर पूर्व अमेरिकेतील मूळ निवासींना येथे जाण्यास भाग पाडले. याला अश्रूंची वाट हे नाव दिले गेले.
१८८० - थॉमस अल्वा एडिसनने विजेच्या दिव्यासाठी पेटंट घेतला.
१८८८ - नॅशनल जिओग्राफिक सोसायटीची वॉशिंग्टन डी.सी येथे स्थापना.
१९१५ - अमेरिकन सैनिकांनी हैती बळकावले.
१९२६ - जॉन लोगीबेअर्डने प्रथमतः टेलिव्हिजनचे प्रात्यक्षिक दाखवले.
१९४३ - दुसरे महायुद्ध - ५० अमेरिकन लढाउ विमानांनी विल्हेम्सहेवन वर बॉम्बफेक केली.
१९४४ - दुसरे महायुद्ध - जर्मन सैन्याने घातलेला लेनिनग्राडचा वेढा दोन वर्षांनी उठला.
१९४५ - दुसरे महायुद्ध - रशियाच्या सैन्याने ऑश्विझ काँसेन्ट्रेशन कॅम्प मुक्त केला. येथे नाझींनी अंदाजे १२,००,००० ज्यू व ईतर व्यक्तिंना मारले. पहा ज्यू स्मृति दिन. ७,५०० लोक जिवंत सुटले.
१९६७ - केनेडी अंतराळ केंद्रात अपोलो १ या अंतराळयानाच्या चाचणी दरम्यान आग. गस ग्रिसम, एडवर्ड व्हाइट व रॉजर शॅफी हे अंतराळवीर मृत्युमुखी.
१९६७ - महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ हे शालेय अभ्यासक्रम तयार करणारे मंडळ स्थापन करण्यात आले.
१९७३ - १९७३चा पॅरिसचा तह. व्हियेतनाम युद्ध अधिकृतरीत्या समाप्त.
१९८३ - जगातील सगळ्यात मोठा पाण्याखालचा बोगदा (५३.९०० किमी)जपानच्या होन्शू व होक्काइदो बेटांमध्ये खुला.
१९८४ - कल्पकम येथील अणुऊर्जा निर्मिती केंद्राचे पहिले युनिट सुरु
१९९१ - मुहम्मद सियाद बारेने मोगादिशुतून पलायन केले.
१९९६ - नायजेरिया लश्करी उठाव. कर्नल इब्राहीम बरे मैनास्साराने महामने औस्मानेला पदच्युत केले.
२००२ - नायजेरियातील लागोसमधील शस्त्रसाठ्यास आग. १,००० ठार.
२०१३ - ब्राझिलच्या सांता मरिया, रियो ग्रांदे दो सुल शहरातील किस नाइटक्लबमध्ये आग लागून २३० ठार, १६० जखमी.
१९२४ - साबु दस्तगीर, भारतीय अभिनेता.
१९२६ - भारतीय रणझुंझार भूदल प्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य.
१९५५ - जॉन रॉबर्ट्स, अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा सरन्यायाधीश.
१९६७ - बॉबी देओल, भारतीय अभिनेता.
१९७४ - चमिंडा वास, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
१४९० - अशिकागा योशिमासा, जपानी शोगन.
Post a Comment