२८ जानेवारी

जानेवारी २८ - दिनविशेष

लाला लजपत राय (जानेवारी २८, इ.स. १८६५ - नोव्हेंबर १७, इ.स. १९२८) हे पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात. लाल, बाल आणि पाल या त्रिकूटातले हे लाल. लाला लजपत राय, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिन चंद्र पाल यांना लाल-बाल-पाल म्हणत.

जागतिक दिवस :

-

ठळक घटना/घडामोडी :

१८४६ - सर हॅरी स्मिथच्या ब्रिटीश सैन्याने अलीवालची लढाई जिंकली.

१९३२ - दुसर्‍या महायुद्धात जपानने शांघाय काबीज केले.

१९८६ - अंतराळ शटल(स्पेस शटल) चॅलेंजरचा उड्डाण करताना विस्फोटात विनाश. सात अंतराळयात्र्यांचा मृत्यू.

१९९९ - देशिकोत्तम हा विश्वभारती विद्यापीठाचा सर्वोच्च सन्मान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांना प्रदान.

२००० - इंग्रजी मजकुराचे हिंदीत भाषांतर करणार्‍या 'अनुवादक' या देशातील पहिल्याच प्रकारच्या संगणक प्रणालीचे गृहमंत्री लालकृष्ण अडवानी यांच्या हस्ते प्रकाशन.

२००२ - टी.ए.एम.ई. फ्लाइट १२० हे बोईंग ७२७-१०० प्रकारचे विमान कोलंबियाच्या दक्षिण भागात अँडीझ पर्वतरांगेवर कोसळले. ९२ ठार.

२००३ - मराठी कवी मंगेश पाडगावकर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर.

जन्म/वाढदिवस :

१८६५ - लाला लजपतराय, लाल बाल पाल या त्रयींतील.

१९०० - के.एम.करिअप्पा, भारताचे पहिले सरसेनापती जनरल.

१९२५ - डॉ.राजारामण्णा, भारतीय अणूशास्त्रज्ञ, अणुउर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष.

१९३० - पंडित जसराज, भारतीय शास्त्रीय गायक.

१९८१ - एलायजाह वूड, अमेरिकन अभिनेता.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

१९८४ - सोहराब मोदी, भारतीय चित्रपट निर्माता व दिग्दर्शक.

१९८६ - स्पेस शटल चॅलेंजरचे प्रवासी ( ग्रेग जार्व्हिस, क्रिस्टा मॅकऑलिफ, रोनाल्ड मॅकनेर, एलिसन ओनिझुका, ज्युडिथ रेसनिक, फ्रांसिस आर. स्कोबी, मायकेल जे. स्मिथ )

१९८९ - हसमुख धीरजलाल सांकलिया, भारतातील उत्खननविषयक संशोधनाचा पाया रचणारे पुरातत्त्ववेत्ते.

१९९६ - बर्न होगार्थ, जंगलसम्राट टारझनला कार्टूनद्वारे अजरामर करणारे.

१९९७ - डॉ.पां.वा. सुखात्मे, भारतीय संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ज्ञ.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top