२९ जानेवारी

जानेवारी २९ - दिनविशेष

निवृत्तिनाथ महाराज : निवृ​त्तिनाथांचे जन्मवर्ष १२७३ ​किंवा १२६८ असे सां​गितले जाते. ज्ञानेश्वर, सोपानदेव मुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते. निवृ​त्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू आ​णि गुरू होते. निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका(ज्ञानेश्वरी) लिहून काढली.

जागतिक दिवस :

-

ठळक घटना/घडामोडी :

१७८० - जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कोलकाता येथे 'कलकत्ता जनरल ऍडव्हर्टायझर' या नावाने साप्ताहिक वर्तमानपत्र सुरु केले. हिकीज बेंगाल गॅझेट नावाने ओळखले जाणारे हे वर्तमानपत्र म्हणजे भारतीय पत्रकारितेची सुरुवात.

१९५९ - ग्रीनलँडजवळून जाणारे डेन्मार्कचे प्रवासी विमान हिमनगावर आदळून ९५ प्रवासी मरण पावले.

२००२ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु. बुशने इराण, इराक व उत्तर कोरिया ही दुष्टतेच्या अक्षात (ऍक्सिस ऑफ इव्हिल) सामील असलेली राष्ट्रे असल्याचे जाहीर केले.

२००४ - १९४९ नंतर प्रथमच चीनहून तैवानला थेट विमानसेवा सुरू झाली.

२००६ - शेख सबाह अल-अहमद अल-जबर अल-सबाह कुवैतच्या अमीरपदी.

जन्म/वाढदिवस :

१२७४ - संत ज्ञानेश्वर महाराजांचे श्रीगुरु निवृत्तीनाथ.

१७४९ - क्रिस्चियन आठवा, डेन्मार्कचा राजा.

१८७१ - चंद्रशेखर शिवराम गोर्‍हे, बडोदा संस्थानचे राजकवी.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

१६१६ - दासो दिगंबरपंत देशपांडे ऊर्फ दासोपंत

१८९९ - आल्फ्रेड सिस्ले, ब्रिटिश चित्रकार.

१९५० - अहमद अल-जबर अल-सबाह, कुवैतचा अमीर.

१९५१ - फ्रँक टॅरँट, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.

१९६३ - रॉबर्ट फ्रॉस्ट, अमेरिकन कवी.

१९७७ - बस्टर नुपेन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top