
उमाजी नाईक (जन्म : ७ सप्टेंबर १७९१ मृत्यू : ३ फेब्रुवारी १८३२) हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक. होते. सन १८५७ च्या उठावाअगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला.तो म्हणजे 'उमाजी नाईक'. देशासाठी फाशीवर जाणारा पहिला नरवीर उमाजी नाईक ३ फेब्रुवारी १८३२ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी हसत हसत फासावर चढला. इतरांना दहशत बसावी म्हणून उमाजीचे प्रेत कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. उमाजीबरोबर इंग्रजांनी त्याचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळकर यांनाही फाशी दिली.
-
१७८३ - अमेरिकन क्रांती - स्पेनने अमेरिकेचे स्वातंत्र्य मान्य केले.
१८०९ - अमेरिकेत ईलिनॉय प्रांताची रचना.
१८६७ - जपानचा युवराज मात्सुहितोचा सम्राट मैजी या नावाने राज्याभिषेक.
१८७० - अमेरिकेच्या संविधानातील १५वा बदल अमलात. मतदानातील वंशभेद संपुष्टात.
१९१३ - अमेरिकेच्या संविधानातील १६वा बदल अमलात. केंद्रीय सरकारला आयकर घेण्यास मुभा.
१९१६ - कॅनडात ओट्टावातील संसदेची ईमारत आगीत भस्मसात.
१९१७ - पहिले महायुद्ध - अमेरिकेने जर्मनीशी राजकीय संबंध तोडले.
१९२५ - भारतातील पहिली विद्युत रेल्वे मुंबई ते कुर्ला या लोहमार्गावर सुरु झाली.
१९३१ - न्यू झीलँडच्या नेपियर शहरात भूकंप. २३८ ठार.
१९४२ - दुसरे महायुद्ध - नाझींनी पिएर लव्हालला फ्रांसच्या पंतप्रधानपदी बसवले.
१९४४ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने मार्शल द्वीपसमूह काबीज केला.
१९५९ - विमान अपघातात अमेरिकन संगीतकार बडी हॉली, रिची व्हॅलेन्स व बिग बॉपर मृत्युमुखी.
१९६६ - सोवियेत संघाचे लुना ९ हे मानवविरहीत अंतराळयान चंद्रावर उतरले.
१९७२ - जपानच्या सप्पोरो शहरात हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
१९८४ - स्पेस शटल चॅलेंजरच्या अंतराळवीरांनी अंतराळात प्रथमतः अनिर्बंध पदार्पण केले.
१९८९ - दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्ष पी.डब्ल्यु. बोथाने राजीनामा दिला.
१९९७ - पाकिस्तानमध्ये निवडणुका.
२००६ - लाल समुद्रात फेरी बुडाली. १,२०० ठार झाल्याची भीती.
१८११ - होरेस ग्रीली, अमेरिकन पत्रकार, संपादक व प्रकाशक.
१८३० - रॉबर्ट आर्थर टॅलबोट, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
१८८७ - हुआन नेग्रिन, स्पेनचा पंतप्रधान.
१९२० - हेन्री हाइमलिख, अमेरिकन डॉक्टर.
१९६३ - रघुराम राजन, भारतीय अर्थशास्त्री.
१४६८ - योहान्स गटेनबर्ग, जर्मन प्रकाशक, स्वयंचलित मुद्रणाचा संशोधक.
१८३२ - उमाजी नाईक, महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक.
१९२४ - वूड्रो विल्सन, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.
१९८५ - फ्रँक ऑपनहाइमर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
२००५ - झुराब झ्वानिया, जॉर्जियाचा पंतप्रधान.
Post a Comment