
पंडित भीमसेन जोशी (फेब्रुवारी ४, इ.स. १९२२; गदग, कर्नाटक - जानेवारी २४ इ.स. २०११; पुणे, महाराष्ट्र) - हे भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते. भीमसेनांनी त्यांची पहिली संगीत मैफिल इ.स. १९४२ साली वयाच्या केवळ एकोणविसाव्या वर्षी पुण्यातील हिराबागेत घेतली. त्यापुढील वर्षीच त्यांच्या काही कानडी आणि हिंदी भाषेतील उपशास्त्रीय गीतांचे पहिल्यांदा ध्वनिमुद्रण झाले.
-
१९४४ - ‘चलो दिल्ली’ चा नारा देत आझाद हिंद सेनेनी दिल्लीकडे कूच केली.
पुण्यात शनिवार वाड्यासमोर थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण जनरल अरुणकुमार वैद्य यांनी केले.
१९८८ - रशियाने नेहरु फुटबॉल चषक जिंकला
१९०६ -प्लुटो हा ग्रह शोधणारे क्लाईड विल्यम टॉमबॉ.
१९२२ - स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी.
१६७० - कोंडाणा किल्ला लढविताना नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले.
Post a Comment