
डॅा श्रीधर व्यंकटेश केतकर (जन्म - २ फेब्रुवारी, इ.स. १८८४; रायपूर, ब्रिटिश भारत - मृत्यु - १० एप्रिल, इ.स. १९३७; पुणे, ब्रिटिश भारत) हे मराठीतील आद्य महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे जनक-संपादक, समाजशास्त्रज्ञ, कादंबरीकार, इतिहास संशोधक व विचारवंत होते. महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या कार्यामुळे ज्ञानकोशकार केतकर या नावानेही ते ओळखले जातात.
दिमित्री मेंडेलीव (फेब्रुवारी ८, १८३४:तोबोल्स्क, रशिया - फेब्रुवारी २, १९०७:सेंट पीटर्सबर्ग, रशिया) हा रशियन रसायनशास्त्रज्ञ होता. त्याने पहिली मूलद्रव्यांची आवर्त सारणी तयार केली. मेंडेलीव १७ भावंडांपैकी सगळ्यात छोटा होता. वयाच्या तेराव्या वर्षी मेंडेलीवचे वडील वारले व तत्पश्चात आईचा उद्योगही आगीत जळून नष्ट झाला.
ग्राउंडहॉग दिन - अमेरिका
१६५३ - अमेरिकेत न्यूऍम्स्टरडॅम गावाची स्थापना. पुढे याचे नाव बदलुन न्यूयॉर्क ठेवण्यात आले.
१८४८ - ग्वादालुपे हिदाल्गोचा तह - मेक्सिको व अमेरिकेची संधी.
१८७८ - ग्रीसने तुर्कस्तान विरुद्ध युद्ध पुकारले.
१८८० - अमेरिकेत वाबाश, ईंडियाना येथे विजेवर चालणारा रस्त्यावरील दिवा सुरू.
१८९७ - अमेरिकेत पेनसिल्व्हेनियाचा विधानसभा आगीच्या भक्ष्यस्थानी.
१९२५ - कुत्र्यांनी ओढलेल्या गाड्या नोम, अलास्का येथे डिप्थेरियाची लस घेउन पोचल्या. या घटनेतुन प्रेरणा घेउन इडिटारॉड स्लेड रेस सुरू झाली.
१९३३ - ऍडोल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.
१९४३ - दुसरे महायुद्ध - स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण.
१९५७ - सिंधु नदी वरच्या गुड्डु बंधार्याचे पाकिस्तानमध्ये भूमिपूजन.
१९६२ - प्लुटो व नेपच्यून ग्रह ४०० वर्षांनी एका रेषेत.
१९८९ - अफगाणिस्तानमधून शेवटचे सोवियेत सैनिक परतले.
१९९८ - फिलिपाईन्समध्ये सेबु पॅसिफिक एर चे डी.सी. ९ जातीचे विमान कोसळले. १०४ ठार.
१८८२ - जेम्स जॉईस, आयरिश लेखक.
१८८४ - डॉ.श्रीधर केतकर, महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे संपादक, समाजशास्त्रज्ञ.
१९०५ - आयन रँड, अमेरिकन लेखक.
१९५४ - जयंत अमरसिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
१९६१ - ज्योई बेंजामिन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९६८ - अमिनुल इस्लाम, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.
१९६९ - इजाझ अहमद, ज्युनियर, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
१९७७ - शकिरा, प्रसिद्ध स्पॅनिश वंशाची कोलंबियन गायिका.
१९०७ - दिमित्री मेंडेलीव, मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीचे संशोधक.
१९१७ - महर्षी अण्णासाहेब पटवर्धन, लोकमान्य टिळकांचे स्नेही, विख्यात वैद्य.
१९७० - बर्ट्रान्ड रसेल, ब्रिटीश गणितज्ञ व तत्त्वज्ञानी.
१९८७ - ऍलिस्टेर मॅकलेन, स्कॉटिश लेखक.
१९९५ - फ्रेड पेरी, इंग्लिश टेनिस खेळाडू.
२००७ - विजय अरोरा, हिंदी चित्रपट अभिनेता.
Post a Comment