
विजय तेंडुलकर (जानेवारी ६, १९२८ - मे १९, २००८) हे प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, पटकथालेखक, राजकीय विश्लेषक होते. विजय तेंडुलकरांचा जन्म जानेवारी ६, १९२८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील धोंडोपंत तेंडुलकर हे स्वतः लेखक, प्रकाशक आणि हौशी नट होते. या कौटुंबिक पार्श्वभूमीतून तेंडुलकरांवर वाङ्मयीन संस्कार होत गेले.
पत्रकार दिन
१८३२ - मुंबई येथे 'दर्पण' चा पहिला अंक प्रदर्शित.- संपादक बाळशास्त्री जांभेकर.
१८३८ - सॅम्युएल मॉर्सने तारयंत्राचा शोध लावला.
१९२४ - विनायक दामोदर सावरकर यांची अंदमानच्या तुरुंगातून सुटका.
१७४५ - ऐलियन माँटगोल्फिएर बलूनच्या साहाय्याने आकाशात जाण्याचे प्रयोग करणारा.
१९२५ - रमेश मंत्री, मराठी विनोदी लेखक.
१९२८ - विजय तेंडुलकर, ज्येष्ठ नाटककार, साहित्यिक, चित्रपटकथा लेखक.
१९५९ - कपिलदेव निखंज, भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू.
१९१९ - थियोडोर रूझवेल्ट अमेरिकेचे २६वे राष्ट्राध्यक्ष.
Post a Comment