
रामकृष्ण परमहंस (पूर्वाश्रमीचे नाव गदाधर चट्टोपाध्याय) (फेब्रुवारी १८,१८३६ - ऑगस्ट १६,१८८६) हे एकोणिसाव्या शतकातील भारतात बंगालमध्ये होऊन गेलेले जगद्विख्यात गूढवादी सत्पुरुष होते. स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांचे प्रमुख शिष्य होते. आधुनिक भारतीय धर्मप्रबोधनात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. ते त्यांच्या शिष्यांमध्ये ईश्वराचे अवतार मानले जातात.
-
१८०१ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन उमेदवार थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखी मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्सनी जेफरसनला राष्ट्राध्यक्ष तर बरला उपाध्यक्ष केले.
१८६४ - अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेच्या सी.एस.एस. हनलीने उत्तरेचे यु.एस.एस. हुसाटॉनिक हे जहाज बुडवले.
१८६५ - अमेरिकन गृहयुद्ध - दक्षिणेच्या सैन्याने कोलंबिया, दक्षिण कॅरोलिनातुन पळ काढला. जाताना शहरास आग लावली.
१८६७ - सुएझ कालव्यातून पहिले जहाज पार झाले.
१९३३ - अमेरिकेत दारूबंदी समाप्त.
१९५७ - अमेरिकेत वॉरेंटन, मिसुरी येथील वृद्धाश्रमात आग. ७२ ठार.
१९५८ - पोप पायस बाराव्याने असिसीच्या संत क्लेरला दूरदर्शक संचाचा रक्षक संत जाहीर केले.
१९५९ - हवामानाचा अभ्यास करण्यासाठीचा पहिला उपग्रह व्हँगार्ड दोन प्रक्षेपित करण्यात आला.
१९६२ - जर्मनीत हांबुर्ग येथे हिमवादळ. ३०० ठार.
१९६४ - अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की अमेरिकन कॉँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्या लोकसंख्येचेच पाहिजेत.
१९७४ - रॉबर्ट के. प्रेस्टन या अमेरिकन सैनिकाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानात(व्हाइट हाउस) हेलिकॉप्टर उतरवले.
१९७९ - चीन व व्हियेतनाममध्ये युद्ध सुरू.
१९९५ - संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीनंतर पेरू व इक्वेडोरने युद्धसंधि केला.
१९९६ - महासंगणक डीप ब्ल्यू बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हकडून पराभूत.
२००६ - फिलिपाईन्सच्या दक्षिण लेयटे भागातील सेंट बर्नार्ड गावावर दरड कोसळून १,००पेक्षा अधिक व्यक्ती ठार.
१८१७ - विल्यम तिसरा, नेदरलँड्सचा राजा.
१८३६ - स्वामी रामकृष्ण परमहंस जयंती
१८८८ - परमाणू रचना व गुणधर्माचे अभ्यासक ’ऑटोस्टर्न’ यांचा जन्म
३६४ - जोव्हियन, रोमन सम्राट.
१८७१ - हिंदू धर्माचे पहिले मिशनरी विष्णूबुवा ब्रम्हचारी यांचे निधन
१९१९ - विल्फ्रिड लॉरिये, कॅनडाचा पंतप्रधान.
१९३४ - आल्बर्ट पहिला, बेल्जियमचा राजा.
Post a Comment