२४ फेब्रुवारी

फेब्रुवारी २४ - दिनविशेष

स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) (फेब्रुवारी २४, इ.स. १९५५; सान फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका - ऑक्टोबर ५, इ.स. २०११; पालो आल्टो, कॅलिफोर्निया, अमेरिका) हा एक अमेरिकन व्यवसायिक होता आणि तो ॲपल ह्या अमेरिकन कंपनीचा सहसंस्थापक व मुख्याधिकारी होता. जॉब्स हा काही काळ पिक्सार अ‍ॅनिमेशन स्टुडिओज‎चा मुख्य व्यवस्थापक होता आणि नंतर तो वॉल्ट डिस्ने कंपनीचा संचालक सदस्य होता. इ.स. १९७० मध्ये जॉब्स याने स्टीव्ह वॉझनियाक, माइक मारक्कुला आणि इतर (ॲपल कंपनीचे सर्व सदस्य) यांच्या समवेत व्यक्तिगत संगणक तयार केला.

जागतिक दिवस :

स्वातंत्र्य दिन - एस्टोनिया.

ठळक घटना/घडामोडी :

१५८२ - पोप ग्रेगोरी तेराव्याने ग्रेगरी दिनदर्शिका प्रदर्शित केली.

१७३९ - कर्नालची लढाई - नादीरशहाचा मुघल सैन्यावर विजय.

१८२६ - यांदाबूचा तह - म्यानमार व इंग्लिश सैन्यातील लढाई थांबली.

१८३१ - डान्सिंग रॅबिट क्रीकचा करार - अमेरिकेतील चॉक्टाओ जमातीने मिसिसिपी नदीच्या पूर्वेकडील भाग अमेरिकेला दिला.

१८४५ - फ्रांसचा राजा लुई-फिलिपने पदत्याग केला.

१८६८ - अमेरिकेच्या अध्यक्ष अँड्रु जॉन्सनवर अमेरिकन काँग्रेसने महाभियोग सुरू केला. अंततः जॉन्सन निर्दोष ठरला.

१९१८ - एस्टोनियाने रशिया पासून स्वातंत्र्य जाहीर केले.

१९३८ - दु पॉँतने नायलॉनचा दात घासण्याचा ब्रश विकण्यास सुरूवात केली.

१९४२ - व्हॉइस ऑफ अमेरिकाचे प्रसारण सुरू.

१९४५ - ईजिप्तच्या पंतप्रधान अहमद मेहेर पाशाची संसदेत कामकाज चालू असताना हत्या.

१९४६ - हुआन पेरॉन आर्जेन्टिनाच्या अध्यक्षपदी निवडून आला.

१९६८ - व्हियेतनाम युद्ध-टेटचा हल्ला - दक्षिण व्हियेतनामने ह्युए शहर जिंकले.

१९७६ - क्युबाने नवीन संविधान अंगिकारले.

१९८९ - रुहोल्ला खोमेनीने सलमान रश्दीला ठार करण्याबद्दल ३०,००,००० अमेरिकन डॉलरचे बक्षीस जाहीर केले.

१९८९ - युनायटेड एरलाइन्स फ्लाइट ८११ या विमानास हवेत असताना भगदाड पडले. ९ प्रवासी खाली फेकले गेले.

१९९९ - चायना सदर्न एरलाइन्सचे टी.यु.१५४ प्रकारचे विमान चीनच्या वेन्झू विमानतळावर कोसळले. ६१ ठार.

२००६ - फिलिपाईन्समध्ये लश्कर उठाव करणार असल्याची कुणकुण लागल्याने राष्ट्राध्यक्ष ग्लोरिया मॅकापगाल-अरोयोने देशात आणीबाणी लागू केली.

मध्यवर्ती उत्पादन शुल्क दिन

जन्म/वाढदिवस :

१३०४ - इब्न बतुता, मोरोक्कोचा शोधक.

१८८५ - चेस्टर निमित्झ, अमेरिकन दर्यासारंग(ॲडमिरल).

१९३४ - बेट्टिनो क्रॅक्सी, इटलीचा पंतप्रधान.

१९४२ - जोसेफ लीबरमन, अमेरिकन राजकारणी.

१९४८ - जे. जयललिता, तमिळनाडूची मुख्यमंत्री.

१९५५ - स्टीव जॉब्स, ॲपल कम्प्युटर्सचा संस्थापक.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

६१६ - एथेलबर्ट, इंग्लंडचा राजा.

१७७७ - जोसेफ पहिला, पोर्तुगालचा राजा.

१७७९ - पॉल डॅनियल लॉँगोलियस, जर्मन ज्ञानकोशकार.

१८१० - हेन्री कॅव्हेंडिश, इंग्लिश संशोधक.

१९२५ - ह्यालमार ब्रँटिंग, स्वीडनचा पंतप्रधान.

१९७५ - निकोलाइ बुल्गॅनिन, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.

१९९८ - मराठी चित्रपट अभिनेत्री ललिता पवार यांचे निधन

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top