
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (२८ मे, इ.स. १८८३:भगूर - २६ फेब्रुवारी, इ.स. १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मराठी भाषेतील कवी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाला तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.
शंकरराव भाऊराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते. त्यांचा जन्म जुलै १४, इ.स. १९२० रोजी झाला. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला. ते इ.स. १९७५ ते इ.स. १९७७ आणि इ.स. १९८६ ते इ.स. १९८८ या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांचा कुशल प्रशासक म्हणून नावलौकिक होता. त्यांनी केंद्रात गृह, अर्थ यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. फेब्रुवारी २६, इ.स. २००४ रोजी त्यांचे निधन झाले.
मुक्ती दिन - कुवैत
१८६१ - कॉलोराडोला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
१९३५ - जर्मनीच्या वायुसैन्य लुफ्तवाफेची पुनर्रचना.
१९३६ - जपानच्या तरुण सैनिकांनी सरकार उलथवण्याचा प्रयत्न केला.
१९५२ - युनायटेड किंग्डमने आपल्याकडे परमाणु बॉम्ब असल्याचे जाहीर केले.
१९७० - अमेरिकेत नॅशनल पब्लिक रेडियोची स्थापना.
१९७२ - अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनिया राज्यातील बफेलो क्रीक बंधारा फुटला. नंतरच्या पुरात १२५ मृत्युमुखी.
१९८४ - अमेरिकेने बैरुतमधुन माघार घेतली.
१९८६ - फिलिपाईन्समध्ये सरकारविरुद्ध उठाव.
१९९० - निकारागुआमध्ये निवडणुका. सँडिनिस्ताचा पराभव.
१९९१ - पहिले अखाती युद्ध - इराकने कुवैतमधुन माघार घेतली.
१९९५ - युनायटेड किंग्डमची सगळ्या जुनी गुंतवणूक बँक बेरिंग्स बँक कोसळली. काही दिवसांपूर्वी बँकेच्या एक अधिकारी निक लीसनने १.४ अब्ज डॉलरच्या पैजा हरल्यामुळे बँकेवर ही पाळी आली.
२००१ - अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवटीने बामियान येथील बुद्धाचे दोन प्रचंड पुतळे धर्मबाह्य ठरवून नष्ट केले.
२००४ - बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाच्या मोस्तार शहराजवळ विमान कोसळून मॅसिडोनियाच्या राष्ट्राध्यक्ष बोरिस त्राज्कोव्स्कीचा मृत्यू.
१८०२ - व्हिक्टर ह्युगो, फ्रेंच लेखक.
१८४६ - बफेलो बिल कोडी, अमेरिकन शिकारी, सैन्याधिकारी.
१८५१ - मोर्डेकाइ शेर्विन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१८६१ - फर्डिनांड, बल्गेरियाचा राजा.
१८६१ - नादेझ्दा कॉन्स्तान्तिनोव्ह्ना कृप्स्काया, रशियन क्रांतीकारी, व्लादिमिर लेनिनची पत्नी.
१८६७ - चार्ली कोव्हेन्ट्री, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१८८५ - अलेक्सांद्रास स्टुल्जिन्स्किस, लिथुएनियाचा राष्ट्राध्यक्ष.
१९०९ - तलाल, जॉर्डनचा राजा.
१९२२ - बिल जॉन्स्टन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९२५ - एव्हर्टन वीक्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
१९२८ - फॅट्स डॉमिनो, अमेरिकन संगीतकार.
१९३२ - जॉनी कॅश, अमेरिकन संगीतकार.
१९४१ - कीथ थॉमसन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
१९५० - हेलन क्लार्क, न्यू झीलँडची पंतप्रधान.
१९५४ - मायकेल बोल्टन, अमेरिकन संगीतकार.
१९५४ - रेसेप तय्यिप एर्दोगान, तुर्कस्तानचा पंतप्रधान.
१९७१ - नोएल डेव्हिड, भारतीय क्रिकेट खेळाडू.
१९०३ - रिचर्ड जॉर्डन गॅटलिंग, अमेरिकन संशोधक.
१९६१ - मोहम्मद पाचवा, मोरोक्कोचा राजा.
१९६६ - विनायक दामोदर सावरकर, भारतीय क्रांतिकारी, मराठी लेखक, कवि.
१९६९ - लेवी एश्कोल, इस्रायेलचा पंतप्रधान.
२००४ - शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.
२००४ - बोरिस त्रायकोव्स्की, मॅसिडोनियाचा राष्ट्राध्यक्ष.
Post a Comment