
विष्णु वामन शिरवाडकर (२७ फेब्रुवारी, १९१२-१० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे त्यांचे वर्णन करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
जागतिक मराठी भाषा दिवस
स्वातंत्र्य दिन - डॉमिनिकन प्रजासत्ताक.
स्वातंत्र्य दिन - डॉमिनिका.
१५६० - बर्विकचा तह - इंग्लंड व स्कॉटलंडने फ्रान्सला स्कॉटलंडमधून घालवून देण्याचे ठरवले.
१५९४ - हेन्री चौथा फ्रान्सच्या राजेपदी.
१७०० - न्यू ब्रिटन या पापुआ न्यू गिनीतील बेटाचा शोध लागला.
१८०१ - वॉशिंग्टन डी.सी. अमेरिकन काँग्रेसच्या अखत्यारीत आले.
१८४४ - डॉमिनिकन प्रजासत्ताकला हैती पासून स्वातंत्र्य.
१८७९ - सॅकेरिन या साखरेसारख्या मानवनिर्मित गोड पदार्थाचा शोध.
१९०० - ब्रिटिश लेबर पार्टीची स्थापना.
१९१२ - वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म.
१९३३ - जर्मनीच्या संसदभवनाला आग लागली.
१९४२ - दुसरे महायुद्ध - जपानच्या लढाऊ विमानांनी अमेरिकेचे विमानवाहू जहाज यू.एस.एस. लँगली बुडवले.
१९४३ - बेर क्रीक, मॉन्टाना येथे एका खाणीत स्फोट. ७४ ठार.
१९५१ - अमेरिकेच्या संविधानातील २१वा बदल - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची कारकीर्द जास्तीत जास्त दोन मुदतीं(८ वर्षे)पुरतीच.
१९६३ - हुआन बोश डॉमिनिकन प्रजासत्ताकच्या राष्ट्राध्यक्षपदी आले.
१९६७ - डॉमिनिकाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
१९८९ - व्हेनेझुएलामध्ये जनक्षोभ.
१९९१ - कुवैतला इराकी सैन्यापासून मुक्ती.
१९९९ - ओलुसेगुन ओबासान्जो नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
२००२ - लंडनच्या स्टॅन्स्टेड विमानतळावर रायनएर फ्लाइट २९६ला आग.
२००२ - गुजरातच्या गोधरा रेल्वे स्थानकात साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आली. ५८ हिंदू यात्रेकरू ठार. या घटनेचा सूड म्हणून उसळलेल्या जातीय दंग्यांमध्ये १,००० हून अधिक व्यक्तींचे प्राण गेले.
२००४ - फिलिपाईन्समध्ये अबु सयफ या अतिरेकी गटाने फेरीवर बॉम्बस्फोट घडवले, ११६ ठार.
२००७ - शांघाय रोखे बाजारातील भाव एका दिवसात ९ टक्क्यांनी कोसळले.
२०१० - चिलीमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.८ तीव्रतेचा भूकंप.
१८०७ - हेन्री वॅड्सवर्थ लाँगफेलो, इंग्लिश कवि.
१९०२ - जॉन स्टाइनबेक, अमेरिकन लेखक.
१९०६ - माल मॅथिसन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
१९१० - केली जॉन्सन, अमेरिकन विमान तंत्रज्ञ.
१९१२ - मराठीतील ज्येष्ठ कवी व नाटककार वि. वा. शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्म, हा दिवस “मराठी भाषा दिवस” म्हणून साजरा केला जातो
१९२० - रेज सिम्पसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९२४ - नॉर्मन मार्शल, वेस्ट इंडीझचा क्रिकेट खेळाडू.
१९२८ - एरियेल शरोन, इस्राइलचे पंतप्रधान.
१९३४ - राल्फ नेडर, अमेरिकन राजकारणी, ग्राहक-हक्क चळवळीची नेता.
१९३९ - लेस्टर किंग, वेस्ट इंडीझचा क्रिकेट खेळाडू.
१९४४ - ग्रेम पोलॉक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९४७ - ऍशली वुडकॉक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९६६ - इनामुल हक, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.
१९७४ - जिमी माहर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१९२१ - शोफील्ड हे, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१९४७ - एफ.ए. मॅककिनन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१८८७ - आनंदीबाई गोपाळराव जोशी, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर.
Post a Comment