३ मार्च

३ मार्च - दिनविशेष

जमशेदजी नसरवानजी टाटा (३ मार्च, इ.स. १८३९ - १९ मे, इ.स. १९०४) पारशी, भारतीय उद्योजक होते. टाटा समूह या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते. त्यांचा जन्म गुजरातमध्ये नवसारी येथे झाला. त्यांना दोराबजी आणि रतनजी अशी दोन अपत्ये होती. जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, बंगळुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये होत.

अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल (३ मार्च १८४७, २ ऑगस्ट १९२२) यांचे सगळ्यात महत्त्वाचे संशोधन म्हणजे दूरध्वनी. दूर अंतरावर असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीचा आवज काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचविणारे यंत्र असावे असे वाटत असल्याने बेल यांनी दूरध्वनी यंत्राचा शोध लावला.

जागतिक दिवस :

हिनामात्सुरी - जपान.

शहीद दिन - मलावी.

मुक्ति दिन - बल्गेरिया.

ठळक घटना/घडामोडी :

१९०४ - जर्मनीचा कैसर विल्हेम दुसर्‍याचा आवाज प्रथम मुद्रित केला गेला.

१९१८ - पहिले महायुद्ध - ब्रेस्ट-लिटोव्स्कचा तह - युद्धातील रशियाचा सहभाग समाप्त. फिनलंड, लात्व्हिया, एस्टोनिया, पोलंड व लिथुएनियाच्या स्वतंत्र अस्तित्त्वाला मान्यता.

१९३१ - अमेरिकेने स्टार स्पँगल्ड बॅनर या गीतास राष्ट्रगीताचा दर्जा दिला.

१९३८ - सौदी अरेबियात खनिज तेल सापडले.

१९३९ - गांधीजींनी मुंबईत आमरण उपोषण सुरू केले.

१९४२ - दुसरे महायुद्ध - जपानी वायुदलाने पश्चिम ऑस्ट्रेलियातील ब्रूम गावावर बॉम्बफेक केली. १०० ठार.

१९४३ - दुसरे महायुद्ध - लंडनमध्ये बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १७३ ठार.

१९४५ - दुसरे महायुद्ध - आत्तापर्यंत तटस्थ असलेल्या फिनलंडने जर्मनी, जपान व मित्रदेशांविरुद्ध युद्ध पुकारले

१९५३ - कॅनेडियन पॅसिफिक एरलाइन्सचे विमान पाकिस्तानच्या कराची शहराजवळ कोसळले. ११ ठार.

१९५८ - नुरी अस सैद १४व्यांदा इराकच्या पंतप्रधानपदी.

१९६१ - हसन दुसरा मोरोक्कोच्या राजेपदी.

१९६६ - ब्रिटिश ओव्हरसीझ एरवेझचे बोईंग ७०७ जातीचे विमान जपानच्या माउंट फुजीवर कोसळले. १२४ ठार.

१९७३ - भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट.

१९७४ - तुर्कस्तानचे डी.सी.१० जातीचे विमान पॅरिसजवळ कोसळले. ३४६ ठार.

१९९१ - लॉस एन्जेल्सच्या पोलिसांचे रॉडनी किंग नावाच्या टॅक्सीचालकाला चोप देतानाचे चित्रीकरण केले गेले.

१९९५ - सोमालियातून संयुक्त राष्ट्रांचे शांतिदल बाहेर पडले.

२००१ - अमेरिकन वायु दलाचे सी.२३ जातीचे विमान जॉर्जियात कोसळले. २१ ठार.

जन्म/वाढदिवस :

१४५५ - जॉन दुसरा, पोर्तुगालचा राजा.

१८३९ - जमशेटजी टाटा, भारतीय उद्योगपती.

१८४७ - अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल, स्कॉटिश संशोधक.

१९३० - इयोन इलेस्कु, रोमेनियाचा राष्ट्राध्यक्ष.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

१७०७ - औरंगझेब, मोगल सम्राट.

१९३७ - आमेलिया इअरहार्ट, अमेरिकन वैमानिक (बेपत्ता).

१९४३ - जॉर्ज थॉम्पसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९७७ - अभिजित कुंटे - भारतीय ग्रँडमास्टर.

१९९९ - गेर्हार्ड हर्झबर्ग, जर्मन रसायनशास्त्रज्ञ.

२००० - रंजना देशमुख, मराठी चित्रपट अभिनेत्री.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top