२ मार्च

२ मार्च - दिनविशेष

सरोजिनी नायडू (१३ फेब्रुवारी १८७९—२ मार्च १९४९). भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्यां, प्रभावी वक्त्त्या व कवयित्री. त्यांचा जन्म हैदराबाद येथे सधन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय (चतर्जी). अघोरनाथांचे मूळ घराणे पूर्व बंगालमधील व गाव ब्रह्मनगर.

जागतिक दिवस :

स्वांतत्र्य दिन - मोरोक्को.

स्वांतत्र्य दिन - टेक्सास.

ठळक घटना/घडामोडी :

१७९१ - पॅरिसमध्ये सेमाफोर यंत्राचे प्रथमतः प्रात्यक्षिक.

१८३६ - टेक्सासच्या प्रजासत्ताकने स्वतःला मेक्सिको पासून स्वतंत्र जाहीर केले.

१८५५ - अलेक्झांडर दुसरा रशियाच्या झारपदी.

१८६१ - झार अलेक्झांडर दुसर्‍याने रशियातील गुलामगिरी बंद केली.

१८७७ - राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी सॅम्युएल जे. टिल्डनला मताधिक्य असूनही अमेरिकन काँग्रेसने रदरफोर्ड बी. हेसला अध्यक्षपदी बसवले. .

१८८८ - कॉँन्स्टेन्टिनोपलचा करार स्वीकृत. ईजिप्तने युद्ध वा शांतिकालात सुएझ कालव्यातून जहाजांना सुखरूप जाउ देण्याची हमी दिली.

१९१७ - रशियात झार निकोलस दुसर्‍याने पदत्याग केला. त्याचा भाउ मायकेल झारपदी.

१९३९ - पायस बारावा पोपपदी.

१९४३ - दुसरे महायुद्ध - बिस्मार्कच्या समुद्रातील लढाई.

१९४६ - हो चि मिन्ह व्हियेतनामच्या अध्यक्षपदी.

१९४९ - कॅप्टन जेम्स गॅलाघरने विमानातून विनाथांबा पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण केली.

१९५५ - कंबोडियाच्या राजा नोरोदोम सिहानुकने पदत्याग केला. त्याचे वडील नोरोदोम सुरामारित राजेपदी.

१९५६ - मोरोक्कोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.

१९६२ - म्यानमारमध्ये लश्करी उठाव.

१९६९ - फ्रांसच्या तुलु शहरात स्वनातीत प्रवासी विमान कॉँकॉर्डची पहिली चाचणी.

१९६९ - उस्सुरी नदीच्या काठी चीन व सोवियेत संघाच्या सैन्यात चकमक.

१९७० - र्‍होडेशिया प्रजासत्ताक झाले.

१९७२ - अमेरिकेचे ’पायोनिअर-१०’ यानाचे गुरुच्या दिशेने उड्डाण झाले

१९९१ - पहिले अखाती युद्ध - रमैलाची लढाई.

१९९२ - उझबेकिस्तान व मोल्डाव्हियाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.

१९९५ - बारिंग्ज बँकच्या घोटाळ्यात निक लीसमला अटक.

१९९६ - जॉन हॉवर्ड ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी.

१९९८ - गॅलेलिओ अंतराळनिरीक्षकाने पाठवलेल्या माहितीवरून निश्चित झाले की गुरूच्या उपग्रह युरोपा वर बर्फाच्या आवरणाखाली समुद्र आहे.

२००४ - इराकवरील अमेरिकन आक्रमण - अल कायदाने अशुराचा मुहुर्त साधून १७० व्यक्तिंची हत्या केली. ५०० जखमी.

२००४ - संयुक्त राष्ट्रांचा शस्त्रनिरीक्षण संघाने ने जाहीर केले की १९९४ नंतर इराककडे अतिविनाशकारी शस्त्रास्त्रे नव्हती.

२००६ - पाकिस्तानच्या कराची शहरात बॉम्बस्फोट. अमेरिकन राजदूतासह ५ ठार, ५० जखमी.

जन्म/वाढदिवस :

१७९३ - सॅम ह्युस्टन, टेक्सासच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष.

१८१० - पोप लिओ तेरावा.

१८५५ - एडमुंड पीट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१८७६ - पोप पायस बारावा.

१९१२- चुड लँग्टन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

१९२३- डॉन टेलर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.

१९३१ - मिखाईल गोर्बाचेव्ह, सोवियेत संघाचा राष्ट्राध्यक्ष.

१९३७ - अब्देलअझीझ बुटेफ्लिका, अल्जीरियाचा राष्ट्राध्यक्ष.

१९५७ - स्टु गिलेस्पी, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.

१९६२ - जॉन बॉन जोव्ही, अमेरिकन रॉक संगीतकार.

१९७७ - अँड्रु स्ट्रॉस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९७९ - दर्शना गमागे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

१९७९ - जिम ट्राउटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९७९ - मार्क व्हर्मुलेन, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

१७३० - पोप बेनेडिक्ट तेरावा.

१७९१ - जॉन वेस्ली, मेथोडिस्ट चर्चचा स्थापक.

१८३५ - फ्रांसिस दुसरा, पवित्र रोमन सम्राट.

१९२१ - निकोलस पहिला, मॉँटेनिग्रोचा राजा.

१९३०- डी.एच. लॉरेन्स, इंग्लिश लेखक.

१९४९ - सुप्रसिध्द कवयित्री, संयुक्त प्रांताच्या पहिल्या स्त्री गव्हर्नर सौ. सरोजिनी नायडू.

१९८६ - डॉ. काशिनाथ घाणेकर.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top