६ मार्च

६ मार्च - दिनविशेष

दिमित्री मेंडेलीव (फेब्रुवारी ८, १८३४:तोबोल्स्क, रशिया - फेब्रुवारी २, १९०७:सेंट पीटर्सबर्ग, रशिया) हा रशियन रसायनशास्त्रज्ञ होता. त्याने पहिली मूलद्रव्यांची आवर्त सारणी तयार केली. मेंडेलीव १७ भावंडांपैकी सगळ्यात छोटा होता. वयाच्या तेराव्या वर्षी मेंडेलीवचे वडील वारले व तत्पश्चात आईचा उद्योगही आगीत जळून नष्ट झाला. १८६९ - दिमित्री मेन्डेलीफने मूलभूत घटकपदार्थांची आवर्त सारणी प्रकाशित केली.

जागतिक दिवस :

स्वांतत्र्य दिन - घाना.

अलामो दिन - टेक्सास.

ठळक घटना/घडामोडी :

१८३६ - टेक्सासचे प्रजासत्ताक - अलामोचा प्रतिकार थांबला. मेक्सिकोच्या १,६०० सैनिकांविरुद्ध १३ दिवस किल्ला लढवणारे १८९ टेक्सासचे सैनिक पराभूत.

१८६९ - दिमित्री मेन्डेलीफने मूलभूत घटकपदार्थांची आवर्त सारणी प्रकाशित केली.

१८९६ - पहिल्या ऑलिंपिक सामन्याचे (पुनरुज्जीवित) उदघाटन

१९०१ - जर्मनीच्या कैसर विल्हेम दुसर्‍यावरील प्राणघातक हल्ला निष्फळ.

१९४० - रशिया व फिनलंडमध्ये शस्त्रसंधी.

१९५३ - जोसेफ स्टालिननंतर जॉर्जी मॅक्सिमिलानोविच रशियाच्या अध्यक्षपदी.

१९६४ - कॅशियस क्लेने मुहम्मद अली हे नाव धारण केले.

१९६४ - कॉन्स्टन्टाईन दुसरा ग्रीसच्या राजेपदी.

१९७५ - अल्जियर्सचा तह - ईराण व इराकने सीमाप्रश्नी संधी केली.

१९८७ - एस.एस. हेराल्ड ऑफ फ्री एंटरप्राइझ ही ब्रिटीश फेरीबोट बेल्जियमच्या झीब्रुग बंदरात बुडाली. १९३ ठार.

१९९४ - मोल्डोव्हा च्या जनतेने निवडणुकीत रोमेनियात सामील होण्यास नकार दिला.

जन्म/वाढदिवस :

१७०६ - जॉर्ज पोकॉक, इंग्लिश दर्यासारंग.

१९०३ - नागाको, जपानी साम्राज्ञी.

१९०५ - लिल नेगेल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

१९१५ - सैयदना मोहम्मद बुर्‍हानुद्दीन, बोहरी धर्मगुरू.

१९२९ - डेव्हिड शेपर्ड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९३३ - किम एल्जी, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

१९३७ - व्हॅलेन्तिना तेरेश्कोव्हा, रशियन अंतराळयात्री.

१९४९ - शौकत अझीझ, पाकिस्तानी पंतप्रधान.

१९५७ - अशोक पटेल, भारतीय क्रिकेट खेळाडू.

१९६९ - झफर इकबाल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

१९७२ - शकिल ओ'नील, अमेरिकन बास्केटबॉल खेळाडू.

१९७७ - नांटी हेवर्ड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

१७५४ - हेन्री पेल्हाम, इंग्लंडचा पंतप्रधान.

१८९९ - व्हिक्टोरिया कैउलानी, हवाईची राजकुमारी.

१९३२ - जॉन फिलिप सूसा, अमेरिकन संगीतकार.

१९५० - आल्बेर लेब्रन, फ्रांसचा फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.

१९५४ - पॉल, ग्रीसचा राजा.

१९७३ - पर्ल बक, अमेरिकन लेखिका.

१९८१ - जॉर्ज गियरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

१९८२ - आयन रँड, रशियन-अमेरिकन लेखक.

१९८६ - जॉर्जिया ओ'कीफ, अमेरिकन चित्रकार.

१९९२ - रणजित देसाई, सुप्रसिद्ध मराठी लेखक.

१९९७ - छेदी जगन, गुयानाचा राष्ट्राध्यक्ष.

१९९७ - मायकेल मॅन्ली, जमैकाचा पंतप्रधान.

१९९९ - इसा इब्न सलमान अल खलिफा, बहरैनचा अमीर.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top