
इ.स. १८३७ साली ग्रेट लेक्स व मिसिसिपी नदी ह्यांना जोडणार्या एका नैसर्गिक कालव्याजवळ शिकागोची स्थापना झाली. शिकागो अमेरिकेच्या इलिनॉय राज्यामधील सर्वात मोठे व अमेरिकेतील तिसर्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. स्वामी विवेकानंदांनी इ.स. १८९३ साली ह्याच शहरात दिलेल्या एका भाषणाच्या सुरूवातीस श्रोत्यांना "Brothers and Sisters of America....." असे उल्लेखून सगळ्या जगाची वाहवा मिळवली आणि हिंदू धर्म आणि प्रथा याची जगाला काही प्रमाणात ओळख करून दिली
बाळकृष्ण शिवराम मुंजे (डिसेंबर १२, इ.स. १८७२ - मार्च ४, इ.स. १९४८) भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक पुढारी व काँग्रेसमधील लोकमान्य टिळकांच्या जहाल विचारसरणीचे समर्थक होते. पेशाने डॉक्टर असलेल्या मुंज्यांनी उत्तरायुष्यात हिंदू पुनरुत्थानाकरता हिंदू महासभेच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्यांनी नाशकातील 'भोंसला मिलिटरी स्कूल' ही सैनिकी शाळेच्या स्थापण्याकरता पुढाकार घेतला; तसेच डेहराडून येथील 'इंडियन मिलिटरी अकॅडमी' या सैनिकी प्रशिक्षणसंस्थेच्या स्थापनेतही पुढाकार घेतला.
राष्ट्रीय सुरक्षा दिवस - भारत
१७८९ - न्यूयॉर्क शहरात अमेरिकन काँग्रेसने अमेरिकेचे संविधान अमलात आल्याचे जाहीर केले.
१७९१ - व्हर्मॉँट अमेरिकेचे बारावे राज्य झाले.
१८३७ - शिकागो शहराची स्थापना.
१८६१ - अब्राहम लिंकन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी.
१८९४ - चीनच्या शांघाय शहरात लागलेल्या प्रचंड आगीत १,००० इमारती भस्मसात.
१९०२ - शिकागो शहरात अमेरिकन ऑटोमोबाइल असोसिएशन तथा ट्रिपल-ए ची स्थापना.
१९३६ - हिंडेनबर्गचे प्रथम उड्डाण.
१९४५ - दुसरे महायुद्ध - फिनलंडने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
१९५१ - प्रथम आशियाई खेळांचे उद्घाटन.
१९६० - हवानाच्या बंदरात फ्रेंच मालवाहू जहाज ला कूबरवर स्फोट. १०० ठार.
१९६६ - केनेडियन पॅसिफिक एरलाइन्सचे विमान टोक्यो येथे उतरताना कोसळले. ६४ ठार.
२००१ - पोर्तुगालच्या कास्तेलो दि पैव्हा शहरातील पूल कोसळला. ७० ठार.
१६७८ - अँतोनियो विवाल्डी, इटालियन संगीतकार.
१८४७ - कार्ल बेयर, ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञ.
१८७५ - मिहालि कॅरोल्यी, हंगेरीचा पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष.
१९०१ - चार्ल्स गोरेन, अमेरिकन ब्रिज खेळाडू व लेखक.
१९०६ - चार्ल्स रुडॉल्फ वॉलग्रीन, जुनियर, अमेरिकन उद्योगपती.
१९२२ - दीना पाठक, गुजराती व हिंदी अभिनेत्री.
१९३७ - ग्रॅहाम डाउलिंग, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
१९४८ - बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक.
१९७७ - लुट्झ ग्राफ श्वेरिन फोन क्रोसिक, जर्मनीचा चान्सेलर.
१९८१ - टोरिन थॅचर, भारतीय अभिनेता.
१९९७ - रॉबर्ट एच. डिक, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
१९९९ - कारेल व्हान हेट रीव्ह, डच लेखक.
२००४ - जॉर्ज पेक, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
२००७ - सुनील कुमार महातो, भारतीय संसदसदस्य.
२०११ - अर्जुन सिंग, भारतीय राजकारणी.




Post a Comment