
स्वातंत्र्यशाहीर गोविंद यांचे पूर्ण नाव गोविंद त्र्यंबक दरेकर (जन्म: ९ फेब्रुवारी, इ.स. १८७४; मृत्यू : २८ फेब्रुवारी, इ.स. १९२६) यांना निसर्गाने कमालीची काव्यप्रतिभा दिली होती. गोविंद यांचे वडील नाशिकमध्ये गवंडीकाम करीत असत. गोविंद चार-पाच वर्षांचे असतानाच वडील वारले. स्वतः गोविंद यांनाही त्यानंतर काही दिवसांतच मोठा ताप भरला व त्यांचे दोन्ही पाय लुळे बनले. ते अपंग झाले. नाशिकमध्ये विनायक दामोदर सावरकर आणि बाबाराव सावरकर हे काही काळ गोविंद यांच्या शेजारीच राहायला होते. सावरकरबंधूंनी 'मित्रमेळा' ही संस्था स्थापन केली होती. या संस्थेत गोविंद रमू लागले. गोविंद यांच्या देशभक्तिपर रचना 'लघु अभिनव माला'मध्ये प्रसिद्धही होऊ लागल्या. पुढे हाच 'मित्रमेळा' 'अभिनव भारत' या नावाने ओळखला जाऊ लागला. गोविंद या संस्थेचे एक महत्त्वाचे सदस्य होते.
-
१६८९ - राजाराम महाराजांचे रायगडावर मंचकारोहण झाले.
१९०० - डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धा प्रथम सुरू.
१९५१ - स्वतंत्र भारताच्य पहिल्या जनगणेचे काम सुरु झाले.
१९३३ - साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.
१९६९ - बोईंग ७४७ विमानाचे सर्वप्रथम उड्डाण.
१९७१ - कॅलिफोर्नियात रिश्टर मापनपद्धतिनुसार ६.४ तीव्रतेचा भूकंप.
१९७३ - बिजु पटनायक ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी.
१९८६ - हॅलेचा धूमकेतु सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला.
२००१ - यु.एस.एस. ग्रीनव्हिल ही अमेरिकेची पाणबुडी जपानच्या एहिमे-मारु या जहाजाला आदळली. १७ ठार.
१८७४ - कवी गोविंद, स्वातंत्र्यशाहीर.
१८७८ - लिओनार्ड मून, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
१८८२ - टॉम कॅम्पबेल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९२२ - जिम लेकर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू .
१९२८ - कृष्णा मेणसे, सीमा लढ्यातील अग्रणी नेते.
१९२९ - लेनोक्स बटलर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
१९६३ - माइक रिंडेल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
१९७० - ग्लेन मॅकग्रा, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
१८९७ - नारायण मेघाजी लोखंडे.
१९६६ - दामूअण्णा जोशी, बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक.
१९७९ - राजा परांजपे, चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते.
१९८१ - न्या.एम.सी.छगला, नामवंत कायदेपंडित.
१९८४ - युरी आन्द्रोपोव्ह, सोवियेत राष्ट्राध्यक्ष.
१९९६ - सी.चिट्टीबाबू चलापल्ली, ख्यातनाम विचित्रवीणावादक.
११९९ - मिनामोटो नो योरिमोटो, जपानी शोगन.
२००० - शोभना समर्थ, अभिनेत्री.
२००१ - दिलबागसिंग, माजी हवाई दल प्रमुख, एर चीफ मार्शल.
२००६ - नादिरा, अभिनेत्री. (जन्म: १९३२)
Post a Comment