१० फेब्रुवारी

फेब्रुवारी १० - दिनविशेष

पुणे विद्यापीठ भारतातील एक प्रसिद्ध आणि अग्रणी विद्यापीठ आहे. मराठी भाषेच्या व संस्कृतीच्या अभ्यासाठी आणि संशोधनासाठी पुणे विद्यापीठाची स्थापना फेब्रुवारी १०, १९४८ मध्ये झाली. बॅ. डॉ. मुकुंद रामराव जयकर हे पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते. इ.स. २००४ साली नामांतर समिती आणि विविध पक्षांनी विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे अशी मागणी केली. यासाठी नामांतर समितीने वेळोवेळी आंदोलने केली. विद्यापीठात झालेल्या अधिसभेत सिनेटने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. स्त्रीशिक्षणासाठी आपले आयुष्य वेचलेल्या सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. ७ जून २०१४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झालं.

जागतिक दिवस :

-

ठळक घटना/घडामोडी :

१८४० - इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया व सॅक्स-कोबर्ग-गोथाच्या राजकुमार आल्बर्टचे लग्न.

१८४६ - सोब्राओनची लढाई - इंग्लिश सैन्याविरुद्ध शीख सैन्याची हार.

१९३१ - भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.

१९४८ - पुणे विद्यापीठाची स्थापना.

१९८१ - लास व्हेगास येथे हॉटेलला आग. ८ ठार, १९८ जखमी.

१९९६ - महासंगणक डीप ब्ल्युने बुद्धिबळात गॅरी कास्पारोव्हला हरवले.

२००६ - इटलीत तोरिनो येथे विसावे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.

२०१३ - महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने जमलेल्या गर्दीमध्ये अलाहाबाद रेल्वेस्थानकात चेंगराचेंगरी होउन ३६ ठार आणि किमान ३९ जखमी.

जन्म/वाढदिवस :

१६८५ - एरन हिल, इंग्लिश लेखक.

१८९४ - हॅरोल्ड मॅकमिलन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.

१९५० - मार्क स्पित्झ, अमेरिकन तरणपटू.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

१९१८ - दुसरा अब्दुल हमीद, ओस्मानी सम्राट.

१९३९ - पोप पायस अकरावा.

१९८२ - नरहर कुरुंदकर, मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक आणि समाजचिंतक.

१९९२ - ऍलेक्स हेली, अमेरिकन लेखक.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top