१८ फेब्रुवारी

फेब्रुवारी १८ - दिनविशेष

रावबहादुर गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी (फेब्रुवारी १८, इ.स. १८२३ - इ.स. १८९२) हे इ.स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते. प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने यांनी समाजसुधारणाविषयक शतपत्रे (वस्तुतः संख्येने १०८) लिहिली. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका ‘शतपत्रांचा इत्यर्थ‘ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. मुळात संख्येने १०० असलेल्या या निबंधांत त्यांनी ‘संस्कृतविद्या‘, पुनर्विवाह‘, पंडितांची योग्यता‘, ‘खरा धर्म करण्याची आवश्यकता‘, ‘पुनर्विवाह आदी सुधारणा‘ ही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली.

जागतिक दिवस :

स्वातंत्र्य दिन - गांबिया.

ठळक घटना/घडामोडी :

१९०५ - भारतीय होमरुल सोसायटीची लंडन येथे शामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापना केली.

भारतीय ज्ञानपीठ संस्थेची स्थापना करण्यात आली.

जन्म/वाढदिवस :

१८२३ - गोपाळ हरी देशमुख, लोकहितवादी समाजसेवक

१९२६ - हॉकी खेळाडू नंदीसिंह यांचा जन्म

१४८६ - बंगालमधील थोर संत चैतन्य प्रभू यांचा जन्म

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

जे. रॉबर्ट ऑपनहाइमर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top