१९ फेब्रुवारी

फेब्रुवारी १९ - दिनविशेष

छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणार्‍या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला.

माधव गोळवलकर हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी-राष्ट्रवादी संघटनेचे द्वितीय सरसंघचालक होते. इ.स. १९४० – इ.स. १९७३ या काळात त्यांनी संघाचे पोषण आणि संवर्धन केले, त्याला भक्कम अखिल भारतीय आकार दिला. संघाची विचार प्रणाली त्यांनीच सूत्ररुपाने सांगितली. समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात त्यांनी अनेक संस्था-संघटनांना सतत प्रेरणा दिली. श्रीगुरुजींचे जीवन अलौकिक आणि ऋषितुल्य होते. राष्ट्रजीवनाच्या विविध अंगाबाबत त्यांनी मूलभूत आणि क्रियाशील मार्गदर्शन केले. श्रीगुरुजी सर्वार्थाने राष्ट्रऋषी होते.

जागतिक दिवस :

-

ठळक घटना/घडामोडी :

१६३० - छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म

१९४६ - भारतीय नौदल सैनिकांनी याच दिवशी इंग्रजाविरुध्द बंड पुकारले.

जन्म/वाढदिवस :

१४७३ - कोपर्निकस

१६३० - पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. शिवाजी महाराज यांचा जन्म

१८९९ - बळवंतराय मेहता, गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री.

१९०६ - माधव सदाशिव गोळवलकर, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

१९१५ - गोपाळ कृष्ण गोखले, भारतीय स्वातंत्र्यसेनानी, मराठी समाजसुधारक.

नरहरी सोनार पुण्यतिथी

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top