५ मार्च

५ मार्च - दिनविशेष

२००१ - मक्केत हज सुरू असताना ३५ भाविकांचा चेंगरुन मृत्यू. मक्का सौदी अरेबियामधील मोठे शहर आहे. हे इस्लाम धर्मातील महत्वाच्या शहरांपैकी एक आहे.येथे असलेल्या 'काबा'स मुस्लिम समाज अत्यंत पवित्र मानतो.तेथे नमाज अदा केल्याने व काबास परिक्रमा केल्याने पुण्य मिळते असे समजतात.प्रत्येक मुसलमान समाजाच्या व्यक्तिस इस्लाम शरियतनुसार हज यात्रा करणे आवश्यक समजल्या जाते.हे मुसलमान समाजाचे पवित्र श्रद्धास्थान आहे.

जागतिक दिवस :

-

ठळक घटना/घडामोडी :

१०४६ - पर्शियन कवी व प्रवासी नसीर खुश्रोने आपल्या सात वर्षांच्या मध्य-पूर्वेच्या भ्रमंतीची सुरुवात केल. या प्रवासाचे वर्णन त्याने सफरनामा या आपल्या पुस्तकात करून ठेवलेले आहे.

१८२४ - युनायटेड किंग्डमने बर्माविरुद्ध युद्ध पुकारले.

१९०२ - तीन दिवसांत १,००,००० सैनिक गमावल्यावर रशियाने मांचुरियातून माघार घेतली.

१९२४ - शफकेत व्हेलार्सी आल्बेनियाच्या पंतप्रधानपदी.

१९३१ - डॅनियेल सालामांका उरे उरुग्वेच्या राष्ट्राध्यक्षपदी.

१९३३ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डिलानो रूझवेल्टने देशातील सगळ्या बँका काही दिवसांसाठी बंद केल्या व आर्थिक व्यवहार करण्यास बंदी घातली.

१९४० - सोवियेत पॉलिटब्युरोने पोलंडच्या १४,७०० युद्धकैद्यांसह २५,७०० पोलिश बुद्धीजीवींची हत्या करण्याचा आदेश मंजूर केला.

१९४५ - दुसरे महायुद्ध - रुह्रची लढाई सुरू.

१९६४ - श्रीलंकेत आणीबाणी.

१९८३ - बॉब हॉक ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानपदी.

१९८८ - टर्क्स व कैकोस द्वीपांनी आपल्या संविधानाची नवीन आवृत्ती अंगिकारली.

१९९१ - पहिले अखाती युद्ध - इराकने सगळ्या युद्धकैद्यांची मुक्तता केली.

२००१ - मक्केत हज सुरू असताना ३५ भाविकांचा चेंगरुन मृत्यू.

जन्म/वाढदिवस :

११३३ - हेन्री दुसरा, इंग्लंडचा राजा.

१३२४ - डेव्हिड दुसरा, स्कॉटलंडचा राजा.

१५१२ - जेरार्डस मर्केटर, फ्लेमिश नकाशेतज्ञ.

१८९८ - चाउ एन-लाय, चीनचा राष्ट्राध्यक्ष.

१९३७ - ओलुसेगुन ओबासांजो, नायजेरियाचा राष्ट्राध्यक्ष.

१९४२ - फेलिपे गॉन्झालेझ, स्पेनचा पंतप्रधान.

१९५९ - वाझ्गेन सर्ग्स्यान, आर्मेनियाचा पंतप्रधान.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :

१५३९ - नुनो दा कुन्हा, भारतातील पोर्तुगीझ गव्हर्नर.

१८१५ - फ्रांझ मेस्मेर, संमोहनविद्येचा ऑस्ट्रियन प्रवर्तक.

१८२७ - पिएर-सिमोन लाप्लास, फ्रेंच गणितज्ञ.

१८२७ - अलेस्सांद्रो व्होल्टा, इटालियन भौतिकशास्त्रज्ञ.

१९५३ - जोसेफ स्टालिन, सोवियेत राष्ट्राध्यक्ष.

१९५५ - अंतानास मर्किस, लिथुएनियाचा राष्ट्राध्यक्ष.

१९६३ - पॅट्सी क्लाइन, अमेरिकन गायिका.

Post a Comment

ShivajiSoft.com
Newer Posts Older Posts

रयतेचा राजा - वाचकांची आवड

© सर्व हक्क सुरक्षित २०१४-१६ रयतेचा राजा
Back To Top